Bangladesh News : बांगलादेशात ढाका आंतरराष्ट्रीय विमानताळावर भीषण आग; कार्गो क्षेत्र जळून खाक, अनेक उड्डाणे रद्द (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangladesh News : ढाका : एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाका येथे आंतरराष्ट्रीय विमानताळ हजरत शाहजलालवर भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी विमानतळाच्या कार्गो क्षेत्रात ही आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की यामुळे अधिकाऱ्यांनी सर्व उड्डाणे तातडीने थांबवावी लागली. अद्याप कोणत्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अग्निशमन दलाचे आणि नागरी संरक्षणाचे प्रवक्ते तल्हा बिन जाशिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल आग विझवण्याचे कार्य करत आहे. विमानतळाच्या गेट क्रमांक ८ जवळ दुपारी २.३० वाजता ही आग लागली होती. कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, पण मालवाहतुकीचे मोठे नुकसान झाले आहे.
आग इतकी प्रचंड होती की, हवेत काळ्या धुराचे लोट पसरले होते. यामुळे आसपासच्या परिसरात हवा प्रदूषित झाली होती. यामुळे लोकांना श्वास घेण्याचा त्रास होत होता.
VIDEO | Dhaka, Bangladesh: A fire broke out at a section of the Cargo Village of Hazrat Shahjalal International Airport this afternoon. More details awaited.#Dhaka #AirportFire #HazratShahjalal (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/flGkHso2xq — Press Trust of India (@PTI_News) October 18, 2025
विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. यामुळे बाटिक एअरची क्वालालंपूरला जाणारी, इंडोगिची मुंबईला जाणारी विमाने धावपट्टीवर अडकली आहेत. तसेच बॅंकॉकहून येणारी यूएस-बांगला उड्डाण, एअर अरबेयाची विमाने चितगाव विमानतळावर वळवण्यात आली आहेत.
खबरदारी म्हणून दिल्लीला जाणारे विमानही कोलकात्याला वळवण्यात आले आहे. कॅथे पॅसिफिकची हॉंगकॉंगला जाणारे विमान सध्या हवेतच गिरक्या घालत आहे. अनेक उड्डाणे चितगाव एअरपोर्टकडे पाठवण्यात आली आहेत.
ढाकाच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आग विझवण्याचे कार्य सुरु आहे. अद्याप आग कशी लागली यामागेच कारण अस्पष्ट आहे.
प्रश्न १. बांगलादेशात कुठे लागली आग?
बांगलादेशात ढाकातील आंतरराष्ट्रीय विमानतळ हजरत शाहजलालवर भीषण आग लागली आहे.
प्रश्न २. हजरत शाहजलालवर विमानतळावरील आगीत किती जीवीतहानी झाली?
बांगलादेशच्या ढाकातील आंतरराष्ट्रीय विमानतळ हजरत शाहजलालवर लागलेल्या आगीत कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती मिळालेलील नाही.
प्रश्न ३. हजरत शाहजलालवर विमानतळावरील आगीत किती वित्तहानी झाली?
बांगलादेशच्या ढाकातील आंतरराष्ट्रीय विमानतळ हजरत शाहजलालवर लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात मालवाहतूकीचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
दक्षिण चीन समुद्रात पुन्हा तणाव! ड्रॅगनच्या लढाऊ विमान अन् जहाजांचा तैवानच्या सीमेत प्रवेश