California Helicopter Crash: कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील हायवे ५० वर सोमवारी (६ ऑक्टोबर) संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास एक हेलिकॉप्टर कोसळले. हायवे ५० पूर्वेकडे ५९ व्या स्ट्रीटजवळ हा अपघात झाला. या अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर लगेचच कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल (CHP) आणि कॅलट्रान्सच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले. अपघातामुळे हायवेच्या पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व लेन बंद करण्यात आल्या, ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
BJP Leader Murder: ओडिशामध्ये भाजप नेते पिताबास पांडाची गोळ्या घालून हत्या; परिसरात खळबळ
कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या या हेलिकॉप्टर अपघातात अनेक लोक जखमी झाले आहेत. पण अद्याप कोणत्याही मृत्यूची पुष्टी झालेली नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघातात बाधित झालेल्या लोकांची नेमकी संख्या जाहीर केलेली नाही. अपघाताच्या व्हिडिओची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर बाल रुग्णालयातून उड्डाण घेत होते. पण उड्डाणानंतर काही वेळातच ते महामार्गावर कोसळले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना नियंत्रण सुटले आणि जमिनीवर कोसळताना दिसत आहे. त्यावेळी अनेक कार आणि इतर वाहने जवळच होती. अपघातानंतरचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले जात आहेत, ज्यामध्ये हेलिकॉप्टरचे तुटलेले भाग आणि अपघातस्थळ स्पष्टपणे दिसत आहे.
कराड नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण; राजकीय मोर्चेबांधणीस सुरुवात, नागरिकांमध्ये उत्सुकता
हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळताच, अग्निशमन विभागासह स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झाले होते. पायलट आणि हेलिकॉप्टरमधील इतर प्रवासी सुरक्षित आहेत की नाही हे सध्या स्पष्ट झालेले नाही. पण या अपघातामुळे सॅक्रामेंटोमध्ये खळबळ उडाली आहे.