फोटो सौजन्य - Social Media
यापूर्वी या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्याची मुदत ३० डिसेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ अशी होती. मात्र अनेक शाळांकडून नोंदणी व शुल्क भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शाळा किंवा विद्यार्थ्यांकडून अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली नाही, त्यांना आता अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
तसेच नियमित मुदत संपल्यानंतरही अर्ज करण्यासाठी पर्याय ठेवण्यात आला आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ८ मार्च २०२६ पर्यंत असेल, तर अतिविलंब शुल्कासह १० मार्च २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या कालावधीत शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र पूर्ण करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.
दरम्यान, ज्या शाळांनी अद्याप विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरलेले नाही, त्यांनी दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे. १० मार्च २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्व शाळांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






