Canda Parents Sponsorship programme : आता कॅनडातील भारतीयांचे पालकांसह राहण्याचे स्वप्न होणार साकार (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Canada News Marathi : ओटावा : भारतीय नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनेडियन नागरिकत्व मिळालेले किंवा कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या परदेशी नागरिकांसाठी एक नवीन प्रोगाम आणला आहे. या नव्या प्रोगामअंतर्गत कॅनडाचे (Canada) सरकार परदेशी नागरिकांना आपल्या पालकांना, आजी-आजोबांना त्यांच्यासोबत राहण्यासाठी बोलवण्याची संधी देत आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतीयांना होणार आहे.
यासाठी ज्या परदेशी नागरिकांनी कॅनडाच्या आयआरसीसी (Immigration Refugees and Citizenship Canada) अंतर्गत २०२० मध्ये अर्ज केले आहेत, अशा लोकांना सध्या आमंत्रण पाठवले जात आहे. तसेच आणखी लोकांना देखील यासाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रणे पाठवली जात आहेत. यामुळे आता तुम्हाला कॅनडामध्ये आपल्या कुटुंबीयांना बोलावण्याची संधी मिळणार आहे. २८ जुलै पासून कॅनडाने अर्जासाठी आमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे.कॅनडाने आतापर्यंत १७ हजार ८६० आंमत्रण पाठवली आहेत. परंतु यातील केवळ १० हजार अर्जच स्वीकारले जाणार आहे.
जर तुम्हाला पॅरेंट्स स्पॉन्सरशिप न मिळाल्या तुम्ही सुपर व्हिसासाठी देखील अर्ज करु शकता. याअंतर्गत ५ वर्षांपर्यंत तुमचे पालक किंवा आजी-आजोबा कॅनडात राहू शकतात.
FAQs (संबंधित प्रश्न)
कॅनडाचा हा प्रोगाम परदेशी नागरिकांना त्यांच्या पालकांसोबत किंवा आजी-आजोबांसोबत कॅनडामध्ये राहण्याची परवानगी देतो.
कॅनडाच्या या पॅरेंट्स स्पॉन्सरशिप प्रोगामचा सर्वात अधिक फायादा भारताला होणार आहे, कारण कॅनडामध्ये भारतीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी कॅनडाने पॅरेंट्स स्पॉन्सरशिप प्रोगाम सुरु केला आहे.
पॅरेंट्स स्पॉन्सरशिपच्या अर्जासाठी तुम्हाला ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.