रशिया-युक्रेन युद्धाचा भडक उडणार (फोटो- सोशल मीडिया)
रशिया-युक्रेन पुढ पेटणार
रशियाची ताकद वाढली
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा चीन दौरा
World Marathi News: गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. दोन देशांमधील युद्ध संपायचे काही चिन्ह दिसत नाही. मात्र आता या युद्धाचा पुन्हा एकदा भडका उडणार असे चित्र निर्माण झाले आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा चीन दौरा.
दुसऱ्या विश्व युद्धात जपानच्या पराभवाला ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चीनने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले. या विजयी परेडला रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग ऊन देखील उपस्थित होतें.
चीन दौऱ्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन व चीनचे प्रमुख शी जिनपिंग एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या दौऱ्यानंतर पुतिन यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाल्याचे म्हटले जात आहे. कारण चीन आता रशियाला शस्त्रास्त्र पुरवणार आहे. त्यामुळे येत्या काळात युक्रेन आणि रशियातील युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
चीनमधील कार्यक्रमानंतर उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन आणि रशियाचे अध्यक्ष यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. आम्ही रशियाला ज्या प्रकारे मदत करू शकतो, त्या प्रकारे करत राहू असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर उत्तर कोरिया आणि रशियात मैत्रीचे नाते असल्याचे पुतिन म्हणाले.
चीन रशियाचे सबंध मजबूत
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी चीनमध्ये विजयी परेडला हजेरी लावली. यामुळे रशिया आणि चीनमधील सबंध अधिक मजबूत झाले आहेत. चीन रशियाला शस्त्रास्त्र पुरवठा करणार आहे. त्यामुळे रशियाची ताकद अधिक वाढणार आहे.
युक्रेनवर धोका वाढला
रशिया आणि युक्रेनमध्ये काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र हे युद्ध संपायचे काही चिन्ह दिसत नाही. रशिया दिवसेंदिवस युक्रेनवर भीषण हल्ले चढवत आहे. युक्रेन प्रत्युत्तर देत आहे. मात्र रशिया बलाढ्य देश असल्याने भीषण हल्ले युक्रेनवर सुरू आहेत. यामध्ये युक्रेनचे खूप नुकसान झाले आहे.
आता मात्र चीन रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील मजबूत संबंध युक्रेनसाठी घातक ठरू शकतात. रशिया आता युक्रेनवर अधिक मोठे हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात अमेरिकेचा दबाव झुगारून रशिया युक्रेनवर अधिक घातक हल्ले करण्याची शक्यता वाढली आहे.