फोटो सौजन्य; iStock
शिकागो: शिकागोमध्ये नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने भारताला मोठा धक्का दिला आहे. तेलंगणातील एका तरुण भारतीय विद्यार्थ्याची शुक्रवारी (29 नोव्हेंबर) दरोडेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिकागोतील एका दुकानाबाहेर घडलेल्या या घटनेने परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी शिकागोमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असताना पार्ट टाइम नोकरी करत होता.
भारतीय वाणिज्य दूतावासाकडून विद्यार्थ्याच्या हत्येबद्दल शोक व्यक्त
दरम्यान घटनेच्या दिवशी स्टोअरमध्ये दरोडेखोरांनी पैशांची मागणी केली. विद्यार्थ्याने त्यांची मागणी पूर्ण केली असतानाही त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या क्रूर घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने तेलंगणातील या विद्यार्थ्याच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच संशयित दरोडेखोरांनी या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (29 नोव्हेंबर) शिकागो येथील एका दुकानाबाहेर घडली. यानंतर भारतीय वाणिज्य दूतावासाने याचा निषेध केला आहे.
परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. याशिवाय भारतीय वाणिज्य दूतावासाने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाणिज्य दूतावासाने पीडित कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दूतावासाने या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. पीडिताचे नातेवाईकापैकी एकाने भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
तेलंगणा सरकार आणि दूतावासाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना, अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी तेलंगणा राज्य सरकार आणि भारतीय दूतावासाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले. ही घटना परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरली आहे. भारत सरकार आणि संबंधित यंत्रणांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे.
या दुर्दैवी घटनेने परदेशात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, ही अपेक्षा व्यक्त होत आहे. भारताने विद्यार्थ्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन योग्य न्याय मिळवून देण्याचे आवाहन सर्व स्तरांवरून केले जात आहे.