भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला (Pakistan Economic Crisis) आपल्या गरिबीत चीनचा (China Help Pakistan) मिदत मिळाली आहे. पाकिस्तानला चायना डेव्हलपमेंट बँकेकडून 700 दशलक्ष डॉलर्सची रक्कम मिळाली आहे. यामुळे संकटात सापडलेल्या देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याला काही प्रमाणात मदत होईल, ज्याची या क्षणी नितांत गरज होती. पाकिस्तान आधीच मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना त्यांना चीनकडून ही मदत मिळाली आहे. चीनकडून सर्वाधिक 30 टक्के विदेशी कर्ज घेतले आहे. पाकिस्तानचे संकट किती गंभीर आहे याचा अंदाज या वस्तुस्थितीवरून लावला जाऊ शकतो की त्याच्याकडे तीन आठवड्यांपेक्षा कमी आयातीसाठी डॉलर्स शिल्लक आहेत.
[read_also content=”पाकिस्तानची निर्मिती ही मानवी इतिहासातील मोठी चूक; जावेद अख्तर यांचा शेजारी देशावर पुन्हा निशाणा! https://www.navarashtra.com/movies/javed-akhtar-said-the-creation-of-pakistan-is-the-biggest-mistake-in-human-history-nrps-372132.html”]
ट्विटरवर ही माहिती देताना पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी चिनी चलन पाकिस्तानसाठी ‘लाइफलाइन’ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘अल्हमदो लिल्लाह! स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला आज चायना डेव्हलपमेंट बँकेकडून $700 दशलक्षची रक्कम मिळाली. काही दिवसांपूर्वी दार यांनी सांगितले होते की, चायना डेव्हलपमेंट बँकेने पाकिस्तानसाठी 700 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. त्याची औपचारिकता पूर्ण झाली आहे
या कर्जामुळे पाकिस्तानच्या कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्याला बळ मिळेलच पण सामान्य माणसांवरील विदेशी कर्जाचा बोजा आणखी वाढेल. या आठवड्यात ही रक्कम स्टेट बँक ऑफ पाकिस्तानपर्यंत पोहोचू शकते. शेहबाज सरकारला देशाच्या परकीय चलनाचा साठा वाढवायचा आहे पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून धक्का बसल्याने सरकारसाठी ते कठीण झाले आहे. त्यामुळे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आता मित्र देशांकडून कर्ज मागत आहेत.