Donald Trump Oath Ceremony Live: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी 25 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, कडेकोट सुरक्षा व्यवस्था ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्प आज 20 जानेवारी 2025 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता डोनाल्ड ट्रम्प आज दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीला जगातील अनेक देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला जगातील अनेक देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
20 Jan 2025 06:20 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभासाठी विक्रमी 250 दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टमुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना मेटा, ॲपल, ॲमेझॉन, गूगल, मायक्रोसॉफ्ट, ओपनएआय आणि उबर कडून प्रत्येकी 1-1 दशलक्ष डॉलर्सचे योगदान देण्यात आले आहे.
20 Jan 2025 06:01 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा काही तासांतच पार पडेल. दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना आणि देशवासियांना एक मोठे आश्वासन दिले आहे. त्यांनी अमेरिकेसमोरील प्रत्येक संकटाचे निराकरण करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच मी जलद गतीने काम करेन, तसेच अमेरिकेसमोरील प्रत्येक संकट सोडवेन."
20 Jan 2025 05:41 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला चीनकडून देशाचे उपराष्ट्रपती हान झेंग पोहोचले आहेत. त्यांनी शपथविधीपूर्वी अमेरिकेचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली आहे. चीनने जारी केलेल्या निवेदनानुसार, या भेटीदरम्यान हान झेंग यांनी अमेरिका आणि चीनमधील आर्थिक आणि व्यापारी संबंधांमध्ये सहकार्याच्या व्याप्तीवर भर दिला.
20 Jan 2025 05:11 PM (IST)
20 Jan 2025 04:40 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. याआधी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहितील. ही अमेरिकेची एक परंपरा असून अनेक वर्षांपासून चालत आली आहे. याचे पालन करून बायडेन ट्रम्प यांना पत्र लिहितील.
20 Jan 2025 04:10 PM (IST)
VIDEO | Here's what Alok Srivastav, general secretary of American Hindu Coalition, said on the Inaugural Hindu Ball organised ahead of President-elect Donald Trump's inauguration ceremony.
"Under the leadership of American Hindu Coalition, we are organising this gala for the… pic.twitter.com/7pfaj83riX
— Press Trust of India (@PTI_News) January 20, 2025
20 Jan 2025 03:22 PM (IST)
युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे शपधविधी पूर्वी अभिनंदन केले आहे. त्यांनी, "युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्समधील विशेष संबंध येत्या काही वर्षांत सुधारत राहतील. तसंच, अटलांटिक समुद्रापार असलेली ही मैत्री अशीच घनिष्ठ राहील" असे म्हटले आहे.
20 Jan 2025 02:43 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘$TRUMP’ नावाची नवी क्रिप्टोकरन्सी लाँच केल्यानंतर काही तासांतच तिची बाजारमूल्य अब्जावधींवर पोहोचली. दरम्यान, त्यांच्या शपथविधीपूर्वी बिटकॉइननेही ऐतिहासिक उच्चांक गाठत 1,09,000 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.
20 Jan 2025 02:04 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. दरम्यान त्यांच्या शपथविधीपूर्वी एका भारतीय कलाकाराने ट्रम्प यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसिद्ध कलाकाराचे नाव सुदर्शन पटनायत असून याने ओडीशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर 47 पूट लांबीचे ट्रम्प यांचे सॅंड आर्ट तयार केले आहे. या चित्रावर त्याने व्हाईट हाऊसमध्ये आपले स्वागत आहे असे लिहिले आहे.
Indian sand artist Sudarsan Pattnaik creates 47-foot-long sand art of #DonaldTrump ahead of swearing-in ceremony. @sudarsansand pic.twitter.com/62Hvm7bPw6
— DD India (@DDIndialive) January 20, 2025
20 Jan 2025 01:40 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांतच जवळपास 100 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये बायडेन प्रशानच्या आदेश आणि कारवाया रद्द करण्याची योजना आहे.
20 Jan 2025 01:08 PM (IST)
आज, ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तेव्हा त्यांना किती पगार मिळेल असा विचार तुम्ही करत असाल तर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही कोट्यवधी रुपये पगार मिळतो. राष्ट्रपतींना दरवर्षी 4,00,000 डॉलर्स वेतन मिळते म्हणजे भारतीय रुपयांनुसार अंदाजे 3 कोटी 46 लाख रुपये आहे.
20 Jan 2025 12:39 PM (IST)
माजी अध्यक्षांमध्ये बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि बराक ओबामा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. माजी प्रथम महिला लॉरा बुश आणि हिलरी क्लिंटन देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, मिशेल ओबामा उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे. ओबामा यांच्या कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
20 Jan 2025 12:22 PM (IST)
अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच त्यांचे मीम कॉईन $TRUMP लाँच केले होते. आता त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनीही स्वतःची क्रिप्टोकरन्सी $MELANIA लाँच केली असून लाँच होताच या क्रिप्टोकरन्सीने खळबळ उडवून दिली आहे. लाँच झाल्यानंतर चार तासांतच त्याची किंमत 24,000 टक्के वाढली. या क्रिप्टोकरन्सीची सुरुवात शून्यापासून झाली आणि काही वेळातच त्याची किंमत 13 डॉलर्सवर पोहोचली आहे.
20 Jan 2025 12:04 PM (IST)
नीता आणि मुकेश अंबानी ट्रम्प यांच्यासोबत 'कँडललाइट डिनर'मध्ये सहभागी होतील आणि उपराष्ट्रपती-निर्वाचित जेडी (आर) आणि उषा व्हान्स यांनाही भेटतील. या डिनरसाठी आलेल्या पाहुण्यांच्या यादीतील सर्वात उल्लेखनीय नावांपैकी एक म्हणजे भारतीय उद्योगपती.
20 Jan 2025 11:42 AM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्पच्या सल्लागाराने क्रेमलिनशी संपर्क साधला असून या चर्चेत युक्रेन युद्धबंदीवर चर्चा होण्याची अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली जात आहे.
20 Jan 2025 11:21 AM (IST)
20 जानेवारी हा दिवस अमेरिकेसाठी खूप खास मानला जातो. यामागचे कारण म्हणजे याच दिवशी अमेरिकेचे नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती शपथ घेतात. 90 वर्षांपासून हा दिवस राष्ट्रपतींच्या उद्घाटनासाठी निश्चित करण्यात आला होता. अमेरिकेतील संविधानानुसार, हा दिवस 20व्या घटनादुरुस्तीने 1933 मध्ये ठरवण्यात आला होता. याआधी, 4 मार्च रोजी शपथविधी घेण्यात येत होता, परंतु नंतर 20 जानेवारीला शपथ घेण्याचा निर्णय लेम डक पीरियड कमी करण्यासाठी घेण्यात आला.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा:
47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प घेणार शपथ; 20 जानेवारीच अमेरिकेसाठी का आहे खास?
20 Jan 2025 11:01 AM (IST)
संयुक्त राज्य अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज 20 जानेवारी रोजी शपथ घेतील. शपथ घेण्यापूर्वी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खास ठरलेला क्षण घडवला. "मेक अमेरिका ग्रेट अगेन व्हिक्ट्री रॅली" मध्ये ट्रम्प यांनी मंचावर मोठा जल्लोष केला. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम ट्रम्पच्या समर्थकांसाठी एक मोठा उत्सव बनला. या कार्यक्रमात ट्रम्पचे कुटुंबीय, सहकारी आणि देशभरातल्या अनेक दिग्गजांचा समावेश होता.
This is the wildest end to a political rally I’ve ever seen.
Trump ends with his rallying cry and then is joined on stage by The Village People and he dances with them. pic.twitter.com/tXFOsjCVhs— Brian Lilley (@brianlilley) January 19, 2025
20 Jan 2025 10:40 AM (IST)
शपथविधी सोहळ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांकाने संपूर्ण कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
🇺🇸🇺🇸🇺🇸 pic.twitter.com/pDHSiEXqM8
— Ivanka Trump (@IvankaTrump) January 19, 2025
credit : social media
20 Jan 2025 10:30 AM (IST)
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज देशाची सूत्रे हाती घेणार आहेत. ट्रम्प आज पदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीपूर्वी त्यांनी विजयी रॅलीला संबोधित केले.
सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा :
20 Jan 2025 10:19 AM (IST)
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातून पाहुणे वॉशिंग्टनमध्ये दाखल होत आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांनीही शनिवारी (दि. 18 जानेवारी 2025 ) खाजगी रिसेप्शनला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पारंपारिक कांचीपुरम सिल्क साडी नेसली होती.
20 Jan 2025 09:53 AM (IST)
अमेरिकेतील कडाक्याच्या थंडीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा खुल्या मैदानात न होता इनडोअर होणार आहे. यंदा अमेरिकेतील थंडीने विक्रमी पातळी गाठली असून तापमान -10 अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले आहे. त्यामुळे सोहळा इनडोअर कॅपिटल रोटुंडामध्ये हलवण्यात आला आहे.
20 Jan 2025 09:46 AM (IST)
पोप फ्रान्सिस यांनी शपथ घेण्यापूर्वी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्थलांतरितांची हकालपट्टी करण्याची योजना संतापजनक असल्याचे म्हटले आहे. यावर पोप यांनी जोरदार टीका केली आहे. एका इटालियन टेलिव्हिजन मुलाखतीत, पोपने ट्रम्पच्या आक्रमक हद्दपारीच्या योजनांशी असहमत असल्याचे व्यक्त केले आणि म्हणाले, "यामुळे गरीबांना, ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांना थकबाकीची बिले भरण्यास सोडले जाईल." पोप म्हणाले की हा दृष्टिकोन समस्येचे निराकरण नाही आणि स्थलांतरितांचे समाजात स्वागत आणि एकत्रीकरण करण्याच्या त्यांच्या वकिलीचा पुनरुच्चार केला.
20 Jan 2025 09:40 AM (IST)
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, उद्घाटनापूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प एकाच लिमो कारमधून कॅपिटॉलमध्ये जातील. चार वर्षांपूर्वी बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला ट्रम्प उपस्थित राहिले नव्हते. आता ही परंपरा पुन्हा सुरू होत आहे. 2017 मध्ये निवर्तमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा देखील बायडेन, ट्रम्प यांच्यासोबत याच कारमधून कॅपिटॉलमध्ये गेले होते.
20 Jan 2025 09:32 AM (IST)
निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर शपथविधीपूर्वी आजही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुमारे 25 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. उद्घाटन समारंभ यूएस कॅपिटलच्या पश्चिमेकडील भागात होणार आहे आणि सुरक्षा नेहमीपेक्षा अधिक कडक असेल. दृश्यमान सुरक्षेत हजारो संघीय एजंट, कायदा अंमलबजावणी कर्मचारी आणि लष्करी सदस्यांचा समावेश असेल जे परिसरात गस्त घालतील.