अमेरिकेच्या फिलाडेल्फियात भीषण स्फोट ; एकाचा मृत्यू, दोनजण गंभीर जखमी (फोटो सौजन्य: एक्स - @PhillyFireDept)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या फिलाडेल्फियात एक मोठी दुर्घना घडली आहे. फिलाडेल्फियाच्या उत्तरेला रविवारी (२९ जून) रोजी भीषण स्फोट झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन विभागाचे कार्यकारी अधिकारी डॅनियल मॅककार्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटात पाच घरांचे मोठे नुकसान झाले आहेत. जखमींना रुग्णलायात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र अद्याप स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही.
Just before 5am, we responded to an explosion on Bristol St. in Nicetown. This became an all-hands response. There are 2 reported injuries and sadly, one reported fatality. Placed under control @ 6:33. Many partners still on scene & more info to come. pic.twitter.com/oHSHGi9ANY
— Philadelphia Fire (@PhillyFireDept) June 29, 2025
सध्या या घटनेचटा तपास सुरु आहे. स्फोट नेमका कुठे आणि कसा झाला याची चौकशी सुरु आहे. तसेच स्फोटात नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसाना झाले आहे. फिलाडेल्फियाच्या अग्निशनम विभागामने या घटनेची माहिती सोशल मीडियावरुन दिली.
अलीकडे फिलाडेल्फियामध्ये दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या मे महिन्याच्या सुरुवातील फिलाडेल्फियात एका पार्कमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होचाय तसेच मोमोरियल डेच्या दिवशी देखील पोलिसांच्या उपस्थित गोळीबाराची घटना घडली होती.
२०२५ च्या सुरुवातीपासून अमेरिकेत विमान अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत पाच पेक्षा अधिक विमान अपघातांच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. अमेरिकेच्या एरिझोन राज्यात दोन लाहन विमानांचा अपघात झाला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. तसेच एक डेल्टा एअपलाईन्सचे विमानाचा देखील टोरोंटो विमानतळावर लॅंडिगदरम्यान अपघात झाला होता. सुदैवाने यातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप बचावले.
याशिवाय, अलास्कामध्येही एक विमान अपघात झाला होता. यापूर्वी वॉशिंग्टन डीसीच्या अमेरिकन एअरलाइन्सट्या प्रवासी विमानाला अमेरिक सैन्याच्या विमान अपघातात 67 जणांचा मृत्यूची नोंद झाली होती. तसेच पेनसिल्व्हेनियात देखील एक विमान अपघाताची घटना नोंदवण्यात आली होती. याशिवाय फिलाडेल्फियात २०२५ च्या सुरुवातील भीषण विमान अपघात देखील घडला होता. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता.