Russia Ukraine War : काय आहे पुतिन यांचा धोकादायक 'P' प्लॅन? ज्यामुळे रशियाचा युक्रेनवर ताबा निश्चित (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War News Marathi : मॉस्को : नुकतेच इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांचा संघर्ष निवळला आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या युद्धाच्या काळात रशिया आणि युक्रेन युद्धही धगधगत होते. दरम्यान आता या युद्धाने पुन्हा एक निर्णयाक वळण घेतले आहे. रशिया आता युक्रेनवर ताबा मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मोठी योजना आखली आहे. या योजनेंतर्गत लवकरच युक्रेन रशियाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.
रशियाने युक्रेन विरोधात मोठ्या युद्धाची तयारी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशिया युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. युक्रेनचे पोकरोव्स्क शहर धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रशियाने या शहराच्या सीमेवर १ लाख १० हजार सैनिक पाठवले असल्याचे म्हटले आहे. या योजनेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ‘P’प्लॅन असे नाव दिले आहे.
रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करु शकतो असे मानले जात आहे. नुकतेच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनना त्यांच्या देशाचा भाग म्हणून संबोधले आहे. यामुळे लवकरच युक्रेनवर मोठा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनचे लष्करप्रमुख ओलेक्झांडर सिर्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पोकरोव्स्क शहराचा १२०० किलोमीटरचा भाग युद्धसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा परिसर रशिया ताब्यात घेण्याचा प्रयत्न गेल्या एक वर्षापासून करत आहे. मात्र अद्याप यामध्ये रशियाला यश मिळालेले नाही. रशियाचे सैन्य युक्रेनच्या तिप्पट आहे.
परंतु यावेळी पुतिन यांनी युक्रेनच्या पूर्वेकडली डोनेस्तक आणि लुहान्स्क भागांवर ताबा मिळवला आहे आणि लकरच ते पोकरोव्स्कवरही नियंत्रण मिळवतील असे स्पष्ट केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यावर शांतता चर्चेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यासाठी रशिया युक्रेनच्या शहरांच्या मेग हात धुवून लागला आहे. युक्रेनचे पोकरोव्स्क
युक्रेनच्या शहर पोकरोव्स्क शहरामध्ये सुमारे ६० हजार लोक राहतात. परंतु या भागात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अनेक लोकांनी स्थलांतर केले आहे.य भागामध्ये युक्रेनच्या कोळशाची खाण देखील आहे. शेकडो कर्मचारी या भागात खाणकाम करतात. परंतु युद्धामुळे सध्या हे कोळशाच्या खाणकामाचे काम बंद पजले आहे.अमेरिकन थिंक टॅंक द इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर दिलेल्या माहितीनुसार, रशियाने या भागावार ताबा मिळवल्यास युक्रेनसाठी ही मोठी हार असेल.
सध्या युक्रेन सैन्य या शहराच्या बचावासाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा वाढवण्याच्या प्रयत्नता आहे. यामुळे सीमेचे रक्षण करण्यासाठी युक्रेनियन सैन्य सुसज्ज होत आहे. शिवाय आधीच युक्रेनचा कुर्स्कचा प्रदेश रशियाच्या ताब्यात आहे. याभागात रशियाने सैनिकांना पाठवून काबा मिळवला होता. यामुळे युक्रेनला मोठा धक्का लागला होता.