आनंद पोफळे : चीनी कम्युनिस्ट पार्टीने (सीसीपी) तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले त्याला आज २६ वर्षे होत आहेत. २० जुलै १९९९ रोजी, सीसीपीचे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंगच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला तो आजपर्यंत चालू आहे. जगभरातील फालुन गोंग साधक हा “निषेध दिवस” पाळत, शांततापूर्ण निदर्शने, रॅली आणि कॅन्डल लाईट विजिलद्वारे चीनमध्ये चालू असलेल्या क्रूर छळाबद्दल लोकांना जागरूक करतात,
फालुन गोंगचे संस्थापक ली होंगजी यांनी १९९२ मध्ये सर्वसामान्यांपर्यंत ही साधना पोचवली. सत्य, करुणा, सहनशीलतेच्या तत्त्वांवर आधारित या ध्यान अभ्यासामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थावर आश्चर्यकारक परिवर्तन जाणवल्याने ही साधना लोकप्रिय झाली. जिआंगच्या महत्वाकांक्षी राजकीय वाटचालीला हा धोका वाटल्याने सुरु झालेला फालुन गोंगचा छळ इतिहासातील मानवतेविरुद्धच्या सर्वात गंभीर गुन्ह्यांपैकी एक ठरला आहे.
शुभांशू शुक्लांनी अंतराळात केले भारताचे नाव रोशन; किती यशस्वी ठरले अॅक्सिओम मिशन?
अभ्यासकांवर हिंसाचार, अमानवीय ब्रेनवॉश सारख्या डावपेचांचा उपयोग करत त्यांना लेबर कॅम्प, नजरबंदी केंद्रे, अनधिकृत तुरुंगात डांबले. १००हून अधिक छळाच्या पद्धती, विषारी पदार्थांचा वापर केला गेला. यूएस-आधारित वेबसाइट Minghui.org ने फालुन गोंगवरील श्रद्धा सोडण्यास नकार दिल्याबद्दल चीनी अधिकाऱ्यांच्या छळामुळे ४,३२२ मृत्यू झाल्याचे प्रसिद्ध केले आहे. २०१६ मध्ये डेव्हिड किल्गोर, डेव्हिड माटास, इथन गुटमन यांनी चीनमधील सक्तीच्या अवयव प्रत्यारोपणावर ७०० पानांचा अहवालात चीनी रुग्णालयांनी प्रतिवर्षी केलेल्या ६०,००० हून अधिक प्रत्यारोपणात दात्यांचा मुख्य स्रोत फालुन गोंग अभ्यासक असल्याचे नमूद केले आहे.
चीनने १९९९ मध्ये फालुन गोंगचे दडपण करण्यासाठी वार्षिक महसुलाच्या एक-चतुर्थांश खर्च केला. सीसीपीने GDP च्या तीन-चतुर्थांशाच्या बरोबरीची संसाधने एकत्रित केली, छळ चालविण्यासाठी लाखो कर्मचाऱ्यांना १०० अब्ज युआनहून अधिक बक्षिसे वाटली.
जगभरातील फालुन गोंग अभ्यासकांनी सीसीपीच्या छळाबद्दल जागरूकतेसाठी आपल्या अविचल प्रयत्नांनी इतरांनादेखील कम्युनिस्ट पक्षाविरुद्ध त्यांच्या हक्कांसाठी, श्रद्धांसाठी उभे राहण्यासाठी प्रेरणा दिली आहे. अमेरिका, कॅनडा, युरोपियन युनियन, तैवानसह जगभरातील सरकारे, अधिकाऱ्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याबद्दल सीसीपीचा निषेध करत, छळ, अवयव प्रत्यारोपण तत्काळ थांबवण्यासाठी आणि नजरकैदेतील फालुन गोंग अभ्यासकांच्या मुक्ततेसाठी आग्रह धरला आहे.
सीमा मुद्यावर कठोर भूमिका, चीनी वस्तूंच्या बहिष्कारामुळे चीनला भारताच्या सामर्थ्याची जाणीव आहे. सीसीपीची विचारधारा, धोरणे भारतासारख्या प्राचीन संस्कृती आणि आधुनिक लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व गोष्टींच्या विरोधात आहेत. भारताने चीनमधील तिबेटी बौद्ध, उईघुर मुस्लिम, ख्रिश्चन समुदाय आणि फालुन गोंगच्या मानवी हक्क उल्लंघनाचा निषेध करण्यात पुढाकार घेण्याची भूमिका भारताला जागतिक नेत्याचा दर्जा प्राप्त करून देईल.
(वरील लेख एपॉक टाईम्स या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राच्या संकेतस्थळा वरील लेखाचा संक्षिप्त मराठीं अनुवाद आहेत)