नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी स्वतःचे सैन्य स्थापन केले निवडणुकीपूर्वी गृहयुद्धाचा धोका ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Nepal former PM Oli forms private army : नेपाळच्या (Nepal) आगामी सार्वत्रिक निवडणुकीला (दि.5 मार्च 2026) अवघे काही महिने बाकी असताना, देशात राजकीय वातावरण चिघळत आहे. माजी पंतप्रधान आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ–युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (CPN-UML) चे प्रमुख के.पी. शर्मा ओली(KP Sharma Oli ) यांनी पक्षाच्या अंतर्गत नवीन सुरक्षा युनिट स्थापन केल्याची घोषणा केल्यानंतर नेपाळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ओली यांनी दावा केला की, देशातील नागरिक, व्यावसायिक आणि माध्यमांना पुरेशी सुरक्षा देण्यात विद्यमान सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच ‘राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा’ या नावाने पर्यायी सुरक्षा पथक उभारावे लागले, असे त्यांनी सांगितले.
देशातील वाढत्या अस्थिरतेचा विचार करून नेपाळच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने शुक्रवारी केंद्र सरकारला निवडणुकांच्या काळात राष्ट्रीय सेना तैनात करण्याची शिफारस केली आहे. परिषद सदस्य आणि संरक्षण सचिव सुमन राज अर्याल यांच्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुका “मुक्त, निष्पक्ष आणि निर्भय” वातावरणात पार पाडण्यासाठी ही तैनाती आवश्यक आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने निवडणूक सुरक्षेसाठी तयार केलेला एकात्मिक सुरक्षा आराखडा देशातील सर्व ७७ जिल्ह्यांना पाठवण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Osaka Consul : चीन- जपान युद्ध जगाच्या उंबरठ्याशी; ‘शीर कापण्याची’ धमकी संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली, जगभरात खळबळ
ओलींच्या या निर्णयामुळे अनेक संशय उपस्थित झाले आहेत. दक्षिण नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांत सीपीएन-यूएमएल कार्यकर्ते आणि युवक निदर्शकांमध्ये झालेल्या तीव्र संघर्षामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, जर हा सुरक्षा दल राजकीय दबावासाठी वापरला गेला किंवा सरकारच्या सैन्याशी भिडला, तर नेपाळमध्ये पुन्हा गृहयुद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो. काठमांडूमध्ये सीपीएन-यूएमएलच्या रॅलीदरम्यान जनरेशन-Z गट आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धडक हेच संकेत देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश
एकीकडे सरकार राष्ट्रीय सैन्य उतरवण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे सर्वात मोठा विरोधी पक्ष स्वतःचे सुरक्षा ताफे मैदानात उतरवत आहे.
यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे नेपाळ पुन्हा एकदा राजकीय संघर्षाच्या विळख्यात अडकणार का? आणि ओली खरोखरीच स्वतःची “खाजगी सेना” उभारत आहेत का?येणारे काही महिने नेपाळच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.
Ans: त्यांनी “राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा” नावाने सुरक्षा युनिट स्थापन केल्याची घोषणा केली आहे.
Ans: आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे सुरक्षीत आणि निष्पक्ष आयोजन सुनिश्चित करण्यासाठी.
Ans: विश्लेषकांच्या मते, परिस्थिती तणावपूर्ण असून धोका पूर्णपणे नाकारता येत नाही.






