फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सिंगापुर: गुगल क्लाउडचे डिरेक्टर जोनाथ डेविड रीस यांना सिंगापूर न्यायालयाने तरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोप आहे.या आरोपाखाली त्यांना तुरूंगवासाची शिक्षा करण्यात आली आहे. त्यांना दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच त्याच्यावर ७ हजार सिंगापूर डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहे. 42 महिन्यांसाठी वाहन चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान रीसने मद्यपान करून वाहन चालवण्याचा आणि निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा आरोप स्वीकारला. त्यांनी कोर्टात सांगितले की ते रॉबिन्सन रोडवरील एका बारमध्ये त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्या ड्रिकं केले. सिंगापूरमध्ये दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे हे माहीत असतानाही देखील त्यांनी गाडी चालवली. त्यांना सुप्रीम कोर्टकडे जायचे होते.
अशातच हा अपघात झाला
मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या गाडीची स्पीड देखील कमी नव्हती. त्यामुळे त्यांची कार सुप्रीम कोर्टाबाहेरील झेब्रा क्रॉसिंगजवळ दिशादर्शक चिन्ह आणि पादचाऱ्यांच्या बीकनला धडकली. अपघातात खांब पूर्णपणे उन्मळून पडला. अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचले आणि काही वेळाने वाहतूक पोलीसही तेथे पोहोचले.
यापूर्वीही नियमांचे उल्लंघन
वाहतूक पोलिसांनी रीसची चौकशी केली असता त्यांनी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त मद्य प्राशन केल्याचे समोर आले. रीसवर यापूर्वी 2016 आणि 2020 मध्येही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला होता. सिंगापूरमध्ये दारू पिऊन गाडी चालवल्यास 12 महिने तुरुंगवास आणि 10 हजार डॉलर्सपर्यंत दंडाची तरतूद आहे.