Mark Rutte
नेदरलँड : भारतासारख्या देशात मंत्रीच नव्हे तर नगरसेवकही कोट्यधीश आहेत. साधे साधे नगरसेवकही एसयूव्हीमधून फिरतात. पण जर एखाद्या पंतप्रधानांना जर सायकलवर बसून कार्यालयातून घरी जाताना पाहिले तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे एखाद्या पोलीस आयुक्तांचा निरोप समारंभही अगदी थाटामाटात पार पडतो. पण युरोपमध्ये जे पाहायला मिळाले ते भारतात क्वचितच पाहायला मिळू शकते.
त्याचे झाले असे की, नेदरलँडचे (डच) माजी पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी आपला कार्यकाळ नुकताच पूर्ण केला. 14 वर्षे त्यांनी नेदरलँडचे पंतप्रधानपद भूषवले. शनिवारी (5 जुलै) त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि सत्तेचे हस्तांतरण केले. पण यानंतर जे घडले त्याचा कोणी विचारही केला नसेल. राजीनामा दिल्यानंतर रुटे यांनी कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि थेट त्यांच्या सायकलवर बसून घरी निघून गेले. भारतासह अनेक देशांमध्ये, राज्यांमध्ये सत्तेचं हस्तातंरण करताना मोठ्या थाटामाटात केले जाते. पण आजपर्यंत इतक्या साधेपणाने आपल्या राजकीय कार्यकाळाचा निरोप घेणारे मार्क रुटे हे पहिलेच आहेत.
माजी आयपीएस अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांनी त्यांच्या या निरोपाचा व्हिडिओ शेअर केला आहे. “14 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर, डचचे माजी पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी त्यांचे उत्तराधिकारी डीक स्कोफ यांच्याकडे अधिकृतपणे सत्ता सोपवण्याचा सोहळा पूर्ण करून पंतप्रधान कार्यालय सोडले.” असा मजकूरही त्यांनी लिहीला आहे. त्यांच्या या निरोपाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे,
14 वर्षे देशाचे नेतृत्व केल्यानंतर, रुटे यांनी माजी गुप्तचर प्रमुख डीक स्कोफ यांच्याकडे नेदरलँडचे नेतृत्व सोपवले. ज्यांनी राजा विलेम-अलेक्झांडर यांच्या देखरेखीखाली अधिकृतपणे एका समारंभात पदभार स्वीकारला. स्कोफ यांनी मंगळवारी दीर्घकाळचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. डच गुप्तचर संस्था आणि दहशतवाद विरोधी कार्यालयाचे 67 वर्षीय माजी प्रमुख यांची नेदरलँडच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी गुप्तहेर प्रमुख डीक स्कोफ यांनी उजव्या विचारसरणीचे नेतृत्व केले आहे. डीक स्कोफ यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाने नेदरलँड्समध्ये “सर्वात कठोर” इमिग्रेशन धोरण लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.