आफ्रिकन देश काँगोमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर ; आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू

आफ्रिकन देश काँगोमध्ये पूर आणि पावसाने कहर केला आहे. लोकांची घरे, दुकाने, संस्था पूर आणि पावसाचे बळी ठरल्या आहेत. या भीषण आपत्तीत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

    आफ्रिकन देश काँगोमध्ये पूर आणि पावसाने कहर केला आहे. लोकांची घरे, दुकाने, संस्था पूर आणि पावसाचे बळी ठरल्या आहेत. या भीषण आपत्तीत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

    मंगळवारी ही माहिती देताना एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, आफ्रिकन देश कांगोमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात किमान २२ जणांचा मृत्यू झाला. कसाई सेंट्रल प्रांताचे गव्हर्नर जॉन काबेया यांनी सांगितले की, कानंगा जिल्ह्यात काही तासांच्या पावसाने अनेक घरे आणि बांधकामाची जागा उद्ध्वस्त केली.

    परिसरात शोधमोहीम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की सुरुवातीला 17 मृत्यूची नोंद झाली होती आणि मंगळवारी आणखी पाच लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली. “भिंत कोसळल्याने दहा लोकांचा मृत्यू झाला, बिकुकूमधील एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचा त्यात समावेश आहे ” मुसळधार पावसामुळे काँगोच्या काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. मे महिन्याच्या सुरुवातीला, रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्वेकडील काँगोच्या दक्षिण किवू प्रांतात पूर आणि भूस्खलनामुळे 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

    महत्त्वाचे रस्ते पुरात , वाहतूक विस्कळीत

    भीषण पूर आणि पावसाची परिस्थिती अशी आहे की महत्त्वाचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. रेल्वे रुळ आणि बसस्थानकांवर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. काबेया म्हणाले की, नुकत्याच आलेल्या पुरामुळे एक तंत्रज्ञान संस्था, एक चर्च आणि एक प्रमुख रस्ता खराब झाला आहे. सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी रात्री उशिरा पूर्व काँगोमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले, किमान चार लोक ठार झाले आणि सुमारे 20 बेपत्ता झाले. यापूर्वी 400 हून अधिक लोक बेपत्ता झाल्याची नोंद आहे.