Sex For Jobs प्रथेमुळे व्यथित झालेल्या घानाच्या राष्ट्रपतींनी ही वाईट प्रथा समूळ नष्ट करण्याचे कठोर आदेश जारी केले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Workplace sexual harassment laws Ghana : जागतिक स्तरावर महिलांच्या सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू असतानाच घाना (african country) या देशातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘नोकरीच्या बदल्यात लैंगिक संबंध’ (Sex For Jobs) ही प्रथा घानामध्ये एका कर्करोगासारखी पसरली असून, आता खुद्द राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही प्रथा केवळ अनैतिकच नाही, तर मानवाधिकारांचे उघड उल्लंघन आहे, असे म्हणत त्यांनी या प्रथेला समूळ नष्ट करण्याचे कठोर आदेश जारी केले आहेत.
कोफोरिडुआ येथे आयोजित एका टाऊन हॉल कार्यक्रमात एका धाडसी विद्यार्थ्याने भरती प्रचेयेतील लैंगिक असमानतेवर आणि महिलांच्या शोषणावर प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नामुळे वातावरणात शांतता पसरली, मात्र राष्ट्राध्यक्ष महामा यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि तितक्याच ठामपणे याचे उत्तर दिले. “महिलांना सन्मानाने काम करण्याचा अधिकार आहे, केवळ शारीरिक शोषणाला बळी पडण्यासाठी त्या शिक्षण घेत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सध्याचे कायदे नोकरी मिळाल्यानंतरच्या छळावर बोलतात, मात्र नोकरी मिळवण्यापूर्वी जो ‘सौदा’ केला जातो, त्याला रोखण्यासाठी नवीन आणि अधिक कडक कायद्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Crimes: ज्याच्या नावाने सीरिया थरथरायचा, ‘त्या’ जनरलला नव्या सरकारने फरफटत नेले; अंगावर काटा आणणारा गुन्ह्यांचा पाढा
घानामध्ये सध्या तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. औपचारिक क्षेत्रातील नोकऱ्या कमी आणि उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे. नेमक्या याच हतबलतेचा फायदा काही विकृत मानसिकतेचे अधिकारी आणि नियोक्ते घेतात. “नोकरी हवी असेल तर काहीतरी द्यावे लागेल,” अशा अटी घालून तरुण महिलांना कोंडीत पकडले जाते. घानाचे माजी कायदेशीर सल्लागार व्हिक्टोरिया ब्राईट यांनी याला ‘भ्रष्टाचाराचा सर्वात घृणास्पद प्रकार’ म्हटले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पदाचा गैरवापर करून कोणाचे शारीरिक शोषण करते, तेव्हा तो केवळ गुन्हा नसून समाजाला लागलेला कलंक असतो.
VIDEO: A Look At How President Mahama’s New No ‘SEX-FOR-JOBS’ Bill May Just Rock Ghana’s Fashion Industry – https://t.co/KDOAoMCOQD — FashionGHANA.com (@FashionGhana) May 7, 2026
credit – social media and Twitter
या समस्येचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे पीडितांचे मौन. घानासारख्या समाजात आजही पितृसत्ताक विचारांचा मोठा पगडा आहे. जर एखाद्या महिलेने शोषणाविरुद्ध आवाज उठवला, तर तिलाच बदनामीला सामोरे जावे लागते. नोकरी गमावण्याची भीती, समाजात होणारी छी-थू आणि पोलीस तक्रार केल्यानंतर मिळणारी वागणूक यामुळे अनेक महिला गुपचूप हे शोषण सहन करतात. मात्र, आता राष्ट्राध्यक्षांनी यावर भाष्य केल्यामुळे पीडितांना एक नवीन आशा मिळाली आहे. खासदार नी क्वार्टेई ग्लोव्हर यांच्या मते, जोपर्यंत पुरुषांच्या या पितृसत्ताक प्रभावाला कायद्याचा लगाम घातला जात नाही, तोपर्यंत कार्यस्थळे महिलांसाठी सुरक्षित होणार नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran Conflict: अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचं जहाज उद्ध्वस्त; इराणनेही डागली क्षेपणास्त्रे, थरारक VIDEO VIRAL
पूर्वी अशा प्रकरणांमध्ये ‘तुझे शब्द विरुद्ध माझे शब्द’ अशी परिस्थिती असायची, ज्यामुळे न्यायालयात गुन्हा सिद्ध करणे अशक्य व्हायचे. परंतु, आता काळ बदलला आहे. खासदार कोफी बेंतेह यांनी नमूद केल्याप्रमाणे, आज प्रत्येक तरुणाच्या हातात स्मार्टफोन आहे. रेकॉर्डिंग, व्हॉट्सअॅप चॅट्स आणि गुपिरीतीने काढलेले व्हिडिओ आता शोषकांचे बुरखे फाडण्यासाठी पुरेसे आहेत. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमुळे आता न्यायालयांना देखील निकाल देणे सोपे होणार आहे. राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानंतर, घानाचे पोलीस आणि गुप्तचर विभाग आता अशा कंपन्यांवर नजर ठेवणार आहेत जिथे अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार येतात.
Ans: ही एक अशी प्रथा आहे जिथे नोकरी देण्याच्या बदल्यात नियुक्ती अधिकारी महिलांकडून लैंगिक संबंधांची मागणी करतात, विशेषतः बेरोजगारीचा फायदा घेऊन हे शोषण केले जाते.
Ans: त्यांनी या प्रथेला थेट गुन्हेगारी ठरवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे आणि शोषकांवर कडक फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Ans: सामाजिक प्रतिष्ठा गमावण्याची भीती, नोकरी जाण्याची भीती आणि पोलीस प्रक्रियेतील गुंतागुंत यामुळे अनेक महिला तक्रार करण्यास धजावत नाहीत.






