• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Hong Kong Fire 4600 Homes Lost 94 Dead Whos Responsible

Hong Kong Fire : 70 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती; 4,600 लोकांची घरे उद्ध्वस्त, हाँगकाँग आगीत 94 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण?

Hong Kong Fire : हाँगकाँगमधील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत सात इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत, प्रत्येक इमारती 32 मजली आहेत. 280 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 28, 2025 | 09:50 AM
Hong Kong Fire 4,600 Homes Lost 94 Dead Who’s Responsible

४६०० लोकांची घरे उद्ध्वस्त... ७० वर्षातील सर्वात मोठी आपत्ती, हाँगकाँग आगीत ९४ जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हाँगकाँगमधील ३२ मजली निवासी संकुलात लागलेल्या भयंकर आगीत सात इमारती पूर्णपणे जळून खाक; मृतांची संख्या ९४ वर.
  • २८० हून अधिक लोक बेपत्ता, ७६ जण जखमी; ४,६०० लोकांच्या घरांचे पूर्ण नुकसान.
  • बांधकाम कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आग जलद पसरल्याचा आरोप; सरकारने ३०० दशलक्ष HK$ मदतपॅकेज जाहीर.

Hong Kong fire 2025 : हाँगकाँगमधील (China) वांग फुक कोर्ट या विशाल निवासी संकुलात लागलेली भीषण आग शहराने मागील ७० वर्षांत पाहिलेली सर्वात दारुण दुर्घटना ठरली आहे. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी अचानक भडकलेल्या आगीने काही क्षणांतच संपूर्ण परिसराला कवेत घेतले आणि सात उंच ३२ मजली इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या. या भयावह घटनेत आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली असून २८० हून अधिक रहिवाशी अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश असून अनेकांनी जीव धोक्यात घालून बचावकार्य केले.

या प्रचंड आगीने संकुलातील सर्व मार्ग, जिने आणि वरच्या मजल्यांकडे जाणारे मार्ग चुटकीसरशी ज्वाळांनी बंद केले. त्यामुळे अनेक रहिवाशी आपल्या घरांत अडकून पडले. ७६ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले असून त्यापैकी ४३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीच्या दुसऱ्या दिवशीदेखील इमारतींच्या वरच्या मजल्यांवर धुराचा आणि ठिणग्यांचा मोठा भडका दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हजारो बचावदलाचे जवान अविरतपणे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Guinea-Bissau : आता ‘या’ देशातही निवडणुकीनंतर अवघ्या तीनच दिवसात झाले सत्तापालट; सीमा केल्या बंद अन् राष्ट्रपती बेपत्ता

वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, वांग फुक कोर्ट कॉम्प्लेक्सची उभारणी १९८३ मध्ये करण्यात आली होती. ८ बहुमजली इमारती, एकूण १,९८४ फ्लॅट्स आणि २०२१च्या जनगणनेनुसार ४,६०० रहिवाशी इतक्या मोठ्या जनसमुदायाचे हे निवासस्थान एका क्षणात राख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेकडो कुटुंबांचे संपूर्ण आयुष्याचे संसार आगीत जळून गेले असून अनेकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

या दुर्घटनेचे कारण नेमके काय, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष लागला नसला तरी आग इतक्या वेगाने पसरली यामागे बांधकामादरम्यान वापरलेल्या ज्वलनशील मचान व फोम मटेरियलला जबाबदार धरले जात आहे. हाँगकाँग पोलिसांनी याबाबत फौजदारी चौकशीचे आदेश दिले असून बांधकाम कंपनीचे तीन अधिकारी अटकेत आहेत. पोलिस अधीक्षक आयलीन चुंग यांनी स्पष्ट केले की कंपनीने “अत्यंत निष्काळजीपणा” दाखवल्याने आग नियंत्रणाबाहेर गेली आणि प्रचंड जीवितहानी झाली.

सरकारने तत्काळ उपाययोजना म्हणून ३०० दशलक्ष हाँगकाँग डॉलर्सचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. विस्थापित नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय, वैद्यकीय मदत, अन्नसामग्री आणि पुनर्वसनासाठी विशेष यंत्रणा कार्यरत आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अशा उंच इमारतींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने

ही घटना हाँगकाँगच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठ्या नागरी आपत्तींपैकी एक म्हणून नोंदली जाणार आहे. प्रचंड मानवी हानी, उध्वस्त झालेली घरे आणि बेपत्ता नागरिकांची वाढती संख्या या सगळ्यामुळे संपूर्ण शहर हदरले आहे. आगीचा ठावठिकाणा शोधून कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा या दिशेने जोरदार पावले उचलत असून येणाऱ्या काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर नियमांना तयार राहण्याचे संकेत मिळत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हाँगकाँगच्या वांग फुक कोर्टमध्ये किती लोक मृत झाले?

    Ans: आत्तापर्यंत ९४ मृत आणि २८० बेपत्ता आहेत.

  • Que: आगीचे मुख्य कारण काय मानले जात आहे?

    Ans: ज्वलनशील मचान आणि फोम मटेरियलमुळे आग जलद पसरल्याचा प्राथमिक अंदाज.

  • Que: सरकारने बाधितांसाठी कोणती मदत जाहीर केली?

    Ans: ३०० दशलक्ष HK$ चे विशेष मदत पॅकेज.

Web Title: Hong kong fire 4600 homes lost 94 dead whos responsible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • China
  • fire Accident
  • international news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’
1

Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’

Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने
2

Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने

China’s Loan List: चीनच्या २ ट्रिलियन डॉलर कर्जाचा खुलासा; अमेरिकाच ठरला सर्वात मोठा लाभार्थी
3

China’s Loan List: चीनच्या २ ट्रिलियन डॉलर कर्जाचा खुलासा; अमेरिकाच ठरला सर्वात मोठा लाभार्थी

हाँगकाँगमध्ये रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीमुळे भीषण परिस्थिती; आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
4

हाँगकाँगमध्ये रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीमुळे भीषण परिस्थिती; आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hong Kong Fire : 70 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती; 4,600 लोकांची घरे उद्ध्वस्त, हाँगकाँग आगीत 94 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण?

Hong Kong Fire : 70 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती; 4,600 लोकांची घरे उद्ध्वस्त, हाँगकाँग आगीत 94 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण?

Nov 28, 2025 | 09:50 AM
मजुरांच्या पिकअपला ट्रॅव्हलची जोरदार धडक; सहा महिला गंभीर जखमी

मजुरांच्या पिकअपला ट्रॅव्हलची जोरदार धडक; सहा महिला गंभीर जखमी

Nov 28, 2025 | 09:44 AM
भारत  WTC च्या अंतिम फेरीत कसा पोहोचणार? श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे असणार कठीण आव्हान; किती सामने लागणार जिंकावे?

भारत WTC च्या अंतिम फेरीत कसा पोहोचणार? श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे असणार कठीण आव्हान; किती सामने लागणार जिंकावे?

Nov 28, 2025 | 09:41 AM
धनश्रीशी घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल दुसऱ्या लग्नासाठी सज्ज? व्हायरल फोटोने उडवली खळबळ

धनश्रीशी घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल दुसऱ्या लग्नासाठी सज्ज? व्हायरल फोटोने उडवली खळबळ

Nov 28, 2025 | 09:31 AM
Solapur News : बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम; जिल्हाधिकार्‍यांच्या ‘त्या’ निर्णयाला निवडणूक आयोगाची स्थगिती

Solapur News : बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम; जिल्हाधिकार्‍यांच्या ‘त्या’ निर्णयाला निवडणूक आयोगाची स्थगिती

Nov 28, 2025 | 09:30 AM
Top Marathi News Today Live: स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज

LIVE
Top Marathi News Today Live: स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज

Nov 28, 2025 | 09:25 AM
Grah Gochar: डिसेंबरमध्ये ‘हे’ ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना नोकरी आणि संपत्तीत मिळणार अपेक्षित यश

Grah Gochar: डिसेंबरमध्ये ‘हे’ ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना नोकरी आणि संपत्तीत मिळणार अपेक्षित यश

Nov 28, 2025 | 09:23 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Nov 27, 2025 | 11:43 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nov 27, 2025 | 11:37 PM
Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Nov 27, 2025 | 08:23 PM
Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Nov 27, 2025 | 08:09 PM
Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Nov 27, 2025 | 07:58 PM
Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Nov 27, 2025 | 02:08 PM
Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Nov 27, 2025 | 11:54 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.