India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
India Pakistan secret meeting Colombo 2026 : जागतिक राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Conflict) या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे एक गुप्त बैठक पार पडल्याचा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे. ‘ट्रॅक १.५ संवाद’ (Track 1.5 Dialogue) अंतर्गत झालेली ही बैठक अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे, कारण यामध्ये केवळ माजी अधिकारीच नाही, तर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयातील विद्यमान अधिकारी आणि सत्ताधारी पक्षांचे बडे राजकारणीही गुप्तपणे सहभागी झाले होते. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस चाललेला तीव्र लष्करी संघर्ष झाला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या विद्यमान अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे एकत्र येण्याची ही पहिलीच मोठी आणि असामान्य घटना आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ने दिलेल्या खळबळजनक वृत्तानुसार, या हाय-प्रोफाइल बैठकीत भारताच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) एक वरिष्ठ प्रतिनिधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचे मोठे भाऊ नवाझ शरीफ यांच्या सत्ताधारी पक्षाचे (PML-N) एक ज्येष्ठ राजकारणी समोरासमोर बसले होते. एवढेच नव्हे तर, या बैठकीत भारतीय लष्कराचे एक माजी प्रमुख (Former Indian Army Chief) आणि पाकिस्तानी लष्करातील एक निवृत्त टू-स्टार अधिकारी देखील उपस्थित होते. हे लष्करी अधिकारी निवृत्तीनंतरही दोन्ही देशांमधील पडद्यामागच्या वाटाघाटींमध्ये (Backchannel Diplomatic Efforts) नेहमी सक्रिय राहिले आहेत. या बैठकीची संवेदनशीलता लक्षात घेता, दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांची नावे अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत आणि भारत किंवा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 1971 Surrender: ‘ढाक्यात 90,000 पाकिस्तानी सैनिकांच्या पँट लटकत…’; बलुच नेते अख्तर मेंगलनी लष्करप्रमुख आसिम मुनीरची काढली अब्रू
दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज (Nuclear-Armed Nations) असल्याने त्यांच्यातील कोणताही लहान संघर्ष जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतो. गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात दोन्ही देशांनी ड्रोन ऑपरेशन्स आणि क्षेपणास्त्र यंत्रणांचा वापर केला होता, ज्यामुळे अण्वस्त्रांच्या वापराची भीती जगभरात निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर या बैठकीला ‘परमाणु कनेक्शन’ म्हणून पाहिले जात आहे. श्रीलंकेतील स्थानिक माध्यमांनीही या बैठकीला दुजोरा दिला असून, भविष्यात कोणतीही आणीबाणीची किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास दोन्ही देशांमधील संकटकालीन संवाद यंत्रणा (Crisis Communication Mechanism) कशी मजबूत ठेवता येईल, यावर गंभीर चर्चा झाली. अचानक उद्भवणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करणे आणि दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये थेट युद्धाची ठिणगी पडण्यापासून रोखणे हा या छुप्या मुत्सद्देगिरीचा मुख्य हेतू होता.
India and Pakistan held a fresh round of unofficial “Track 2” talks in Colombo and Bangkok earlier this week, according to a report by WION News. The report said the meetings focused on strengthening crisis-management mechanisms and preventing future escalations between the two… pic.twitter.com/DDFyucWTpf — NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) June 25, 2026
credit – social media and Twitter
या बैठकीदरम्यान दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सीमापार दहशतवाद आणि पाणी वाटपाशी संबंधित (Indus Water Treaty) गंभीर मुद्द्यांवर अत्यंत उघडपणे आणि स्पष्टपणे चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीतील निष्कर्ष आणि चर्चा औपचारिक ‘ट्रॅक वन’ (Track One Dialogue) माध्यमांद्वारे दोन्ही देशांच्या सरकारांपर्यंत पोहोचवण्यावर एकमत झाले आहे. ‘ट्रॅक वन’ संवादाचा अर्थ दोन्ही देशांच्या विद्यमान सरकारांमध्ये अधिकृतपणे आणि थेट चर्चा होणे असा असतो.
I usually don’t talk niceties about Pakistan but we are witnessing some smart ass diplomacy from them NGL! On one hand they are trying to negotiate a peace deal between Iran and the US, simultaneously engaging with arch rival India in Colombo and Thailand, becoz they know if… https://t.co/BjIJT4nEIq — Rudraksh (@Intel_Jackal) June 25, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर
एकीकडे कोलंबोमध्ये ही अनौपचारिक चर्चा झाली असली, तरी नवी दिल्लीतील सूत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सध्या पाकिस्तानसोबत कोणत्याही अधिकृत किंवा औपचारिक चर्चेच्या मनःस्थितीत नाही. भारताची भूमिका ‘दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत’ या भूमिकेवर ठाम आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या काही भारतीय प्रतिनिधींनी दोन्ही देशांमध्ये चर्चा पुन्हा सुरू व्हावी अशी वैयक्तिक इच्छा व्यक्त केली असली, तरी मोदी सरकार पाकिस्तानला राजनैतिक पातळीवर एकाकी पाडण्याच्या आपल्या रणनीतीवर ठाम आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात असताना भारत कोणतीही घाई करण्याच्या मनःस्थितीत नाही, मात्र सीमा रेषेवर शांतता राखण्यासाठी अशा प्रकारच्या पडद्यामागच्या हालचाली (Backchannel Diplomacy) अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.






