Middle East War : आता फक्त भारतच जगाला वाचवू शकतो? युद्ध थांबवण्यासाठी फिनलँडची PM मोदींकडे धाव (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींनी मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण (US-Israel VS Iran) संघर्षात शांतीदूत बनण्याचे आवाहन केले आहे. भारताची संतुलित परराष्ट्र धोरणे आणि जागतिक स्तरावरील प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही विनंती केली आहे. भारतच जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या संकटातून बाहेर काढू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे.
फिनलँढचे राष्ट्राध्यक्ष स्टॅब यांनी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या रायसीना डायलॉग २०२६’ बोलताना म्हटले की, भारता हा एकमेव असा देश आहे ज्यावर इराण आणि अमेरिका-इस्रायल दोन्ही गट पूर्णपणे विश्वास ठेवतील. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या इराणच्या नेत्यांशी केलेल्या चर्चेचा उल्लेख करत म्हटले की, भारताच्या सकारात्मक कूटनीतीमुळे त्यांची जहाजे संकटातून बाहेर पडली.
यामुळे भारताने सक्रियपणे मध्यस्थीची भूमिका घेतल्यास युद्ध नक्कीच थांबेल असा विश्वास व्यक्त केला आहे. अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायलसोबक मिळून इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी ही लष्करी मोहिम सुरु केली होती. या मोहिमेअंतर्गत इराणच्या लष्करी तळांवर, अणु केंद्रावर, मुख्यालयांवर आणि काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला होता.
यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei )आणि इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी कमांडर मारले गेले होते. यामुळे इराणने आक्रमक पवित्रा घेत अमेकिका-इस्रायलवर तीव्र हल्ले सुरु केले. यामध्ये इराणने मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अमेरिका-इस्रायलच्या लष्करी तळांना आणि दूतावासांना लक्ष्य केले होते. इस्रायल-अमेरिका सैन्यही यावर प्रतिहल्ला करत होते.
या हल्ल्यात आतापर्यंत २००० हून अधिक निरापराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये १६५ लहान मुलींचा समावेश आहे. इराणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, वीज केंद्रे आणि विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. इस्रायल-अमेरिकेचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. धक्कादाक बाब म्हणजे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक बाजारात तेल आणि गॅस पुरवठा खंडित झाला आहे.
ज्याचा जागतिक अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला आहे. जागतिक स्तरावर मोठे उर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे भारतावरही परिणाम झाला आहे. युद्धाचा १८ दिवस उलटून गेला असून विनाश थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशा परिस्थिती जागतिक स्तरावर भारताकडे कूटनीतिक दबावाची मागणी केली जात आहे.
Ans: फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी भारताने मध्यपूर्वेतल सुरु असलेल्या इराण अमेरिका युद्धाला थांबवण्यासाठी मध्यस्थी करुन शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे.
Ans: भारताची संतुलित परराष्ट्र नीती आणि इराण अमेरिकेशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत प्रभावशाली शांतीदूत ठरु शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.
Ans: मध्यपूर्वेतील संघर्षामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून जाागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यात तुटवडा पडला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने मोठे जागतिक उर्जा संकट निर्माण होण्याची भीती वाढली आहे.






