न्यू जर्सी: अमेरिकेतील न्यू जर्सी (New Jersey) येथे भारतातील टेक दाम्पत्याचा आणि त्यांच्या दोन मुलांचा गुढरित्या मृत्यू झाला आहे. न्यू जर्सीतील त्यांच्या राहत्या घरी या कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान पोलिसांनी खून किंवा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच तांत्रिकाने अशा पद्धतीचे कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही संशय व्यक्त होतोय. तेज प्रताप (वय 44), पत्नी सोनल परिहार (वय 42) आणि त्यांच्या दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. (Tej Pratad Death Case)
[read_also content=”पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यांनंतर इस्रायलकडून युद्धाची घोषणा, नागरिकांना दिले ‘हे’ निर्देश https://www.navarashtra.com/world/after-russia-ukraine-war-indications-of-israel-palestine-war-nrsr-466968.html”]
उत्तरप्रदेश मधील हे दाम्पत्य 2009 मध्ये न्यू जर्सीत राहायला गेलं होतं. तेज प्रताप यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांना एचसीएलमध्ये नोकरी मिळाली. नोकरीची ऑफर स्वीकारल्यानंतर ते पत्नी सोनलसह 2009 मध्ये न्यू जर्सीत स्थायिक झाले होते, अशी माहिती तेज प्रताप यांचा भाऊ विवेक यांनी दिली.
न्यू जर्सीतील मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेज प्रताप यांनी आधी पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान या चौघांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी उत्तरप्रदेशमधील त्यांच्या मूळ गावी आणता यावेत, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.