फोटो सौजन्य; सोशल मीडिया
बेरूत: एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुका सुरू होत्या. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे पुनरागमन झाले आणि अमेरिकेत त्याच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातवरण होते. इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले. मात्र या दरम्यान दुसरीकडे इस्त्रायलचे बेरूतवर हल्ले सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये आंतराष्ट्रीय विमानतळावर हल्ले केले.
हिजबुल्लाहच्या कमांड सेंटर आणि शस्त्रास्त्र डेपोला लक्ष्य करण्यात आले
हे हल्ले बेरूतच्या बेका खोऱ्यात विविध भागात करण्यात आले. इस्त्रायल अजूनही हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करून हल्ले करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांत 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्त्रायल संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी विमानतळ आणि आसपासचा परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले होते अशी माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहच्या कमांड सेंटर आणि शस्त्रास्त्र डेपोला लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायली संरक्षण दलाचे म्हटले आहे.
हल्ल्यामुळे 1 दशलक्षहून अधिक लोकांचे पलायन
मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायली लष्कराने मंगळवारी ( दि. 5) देखील बारजा बेरूतमधील शहरातील अपार्टमेंट इमारतीवर हवाई हल्ला केला. यामध्ये सुमारे 30 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. तर याच वेळी इस्त्रायल गाझामध्ये बीत लाहिया शहरापर्यंत पोहोचले असून, या भागात हमासच्या दहशतवाद्यांचे जमाव पुन्हा वाढत असल्याची इस्रायलने दावा केला आहे. या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये 1 दशलक्षाहून अधिक नागरिकांनी आत्तापर्यंत पलायन केले आहे.
हिजबुल्लाहचा नवीन प्रमुख नईम कासिम इस्त्रायलच्या निशाण्यावर
हिजबुल्लाहच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नईम कासिम यांनी इस्त्रायशी युद्धबंदीच्या चर्चेची तयारी दर्शवली होती. नईम कासिम यांनी म्हटले होत की, इस्त्रायने आदी हल्ले थांबवावेत. तर इस्रायलने त्यांना यावर इशारा दिला की, हिजबुल्लाहचे नेते जुन्या वाटेवरून जात राहिल्यास त्यांचे परिणाम गंभीर होतील. इस्रायलने हिजबुल्लाच्या प्रमुख नेत्यांपैकी पाच जणांना संपवले असून, संघटनेची लष्करी शक्ती संपवण्याच्या मोहिमेत त्यांना यश मिळाले आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, लेबनॉनमध्ये शांतता आणण्यासाठी हिजबुल्लाहचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करणे आवश्यक आहे.
इस्त्रायचे नवीन संरक्षण मंत्री
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री याव गॅलंट यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी इस्रायल कॅट्झ यांना नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. गाझा आणि लेबनॉनमधील संघर्षाच्या वेळी गॅलंट यांची भूमिका असमाधानकारक ठरल्याने त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले. युद्धाच्या काळात बेंजामिन नेतन्याहूंच्या या पावलाने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या इस्रायल सात आघाड्यांवर युद्ध लढत असून त्यात गाझा स्थित हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह विरोधातील कारवायाही महत्त्वाच्या आहेत.
हे देखील वाचा- ट्रम्प जिंकताच चीनचा सूर बदलला; तणावपूर्ण परिस्थिती असूनही दिल्या शुभेच्छा