Israel-Hamas War: '... तर आमच्या अटी मान्य करा' ; इस्त्रायलच्या राजदूताचा हमासला थेट इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: सध्या हमास आणि इस्त्रायलमधील संघर्ष सुरुच आहे. 42 दिवसांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलने मंगळवारी (18 मार्च 2025) गाझावर मोठा हवाई हल्ला केल्या. त्यानंतरही इस्त्रायलने गाझा पट्टीवरील हवाई हल्ले सुरुच ठेवले. या हल्ल्यात आतापर्यंत 40 हून अधिका पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक हमासचे वरिष्ठ अधिकारी देखील मारले गेले आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासने सर्व ओलिसांच्या सुटकेची अट मान्य न केल्याने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान भारतातील इस्त्रायली राजदूतांनी हमासबाबत मोठे विधान केले आहे.
भारतातील इस्त्रायलचे राजदूत रुवेन यांनी इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, “इस्त्रायल आणि हमासमधील 42 दिवसांची युद्धबंदी आता तुटली आहे आणि हमासने ओलिस ठेवलेल्या इस्त्रायली लोकांना सोडण्यापासून नकार दिल्याने हा संघर्ष पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे युद्धबंदीच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, मात्र इस्त्रायलकडे आता लष्करी दबावाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही असे म्हटले आहे.”
VIDEO | Here’s what Ambassador of Israel to India Reuven Azar said on Israeli strikes across Gaza which killed more than 400 Palestinians and shattered ceasefire with Hamas.
“Hamas has left Israel no choice. They have rejected the proposals of the American administration envoy… pic.twitter.com/2Y0VRPGEV3
— Press Trust of India (@PTI_News) March 18, 2025
हमासकडे एकच पर्याय आहे
इस्त्रायली राजदूत रुवेन यांनी म्हटले आहे की, “हमासने शांततेसाठी इस्त्रायलच्या सर्व अटी मान्य केल्या तरच इस्त्रायल गाझावरील हल्ले थांबवेल.” गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हमासकडे फक्त दोनच मार्ग आहेत. ताब्यात ठेवलेल्या सर्व ओलिसांची सुटका करणे आणि भविष्यातील इस्त्रायलविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा षड्यंत्र करणार नाही याची हमी देणे. मात्र इस्त्रायली बंधाकांना सोडण्याचा कोणताही हेतू हमासच्या कृतीतून दिसून आलेला नाही. हमासला शांतता नको आहे असेही रुवेन यांनी म्हटले आहे.
हमासने अमेरिकम मध्यस्थांचा कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला आहे. राजदूत रुवेन यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकवेळा हमासला अल्टीमेटम देऊनही इस्त्रायली ओलिसांची सुटका केली नाही. यामुळे अशा परिस्थितीत इस्त्रायलकडे लष्करी कारवाई करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही असे रुवेन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचा इस्त्रायला पाठिंबा
इस्त्रायली राजदूत रुवेन यांनी अमेरिकेने इस्त्रायलला संपूर्ण पाठिंबा दिला असल्याचे म्हटले. गाझातील दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या बाजूने शांतता राखण्यासाठी अमेरिका इस्त्रायलला पाठिंबा देत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘या’ युरोपियन देशात LGBTQ+ समुदायाबाबत मोठा निर्णय; सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने