Israel Iran War : 'आम्ही क्षेपणास्त्रे हवेतच पाडली' ; इराणच्या हल्ल्यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा
Iran Israel Ceasefire News Marathi: मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल युद्धासंबंधी मोठा दावा केला आहे. त्यांनी १२ दिवसांच्या युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षविराम झाल्याची घोषणा केली आहे. परंतु हा दावा इराणने नाकारला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी युद्धबंदीबाबत असा कोणताही करार करण्यात आला नसल्याचे म्हटले आहे.
अराघची यांनी सांगितले की, इस्रायलसोबत अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. इस्रायलमने इराणवरील हल्ले थांबवले तरच इराण इस्रायलवर कोणताही हल्ला करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
Iran-Israel War Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्धबंदीची घोषणा पण इराण म्हणतो, कोणताही समझोता नाहीच…
डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारमधील इराणच्या हवाई हल्ल्यानंतर इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीची घोषणा केली होती. परंतु इराणने असा कोणताही करार झाले नसल्याचे म्हटले आहे. यामुळे इराण आणि इस्रायलधील युद्धबंदीबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
इराणने कतारमधील अमेरिकन विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीची घोषणा केली. इराणने दावा केला की कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला करुन आम्ही इस्रायली हल्ल्याचा बदला घेतला आहे. परंतु कतारच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हवेत हाणून पाडल्याचे म्हटले आहे. यामध्ये अमेरिकन तळाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे कतारने म्हटले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे बहुतेक हल्ले हाणून पाडल्याचा दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे युद्धबंदीसाठी दोन्ही देशांनी मदत माहतिली. दोन्ही देशांनी एकत्र येऊन शांततेसाठी मागणी केली. ट्रम्प यांनी म्हटले की, मला माहित होते की आता युद्धबंदीची वेळ आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. ही केवळ इस्रायल आणि इराणसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे.
याशिवाय ट्रम्प यांनी दावा केला की, दोन्ही देश आता शांतता आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करतील. दोन्ही देश यापुढे सत्य आणि नितिमत्तेच्या मार्गावर राहितील. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, युद्धबंदी सहा तासानंतर लागू होऊल इराण पहिल्यांदा १२ तासांत आपली शस्त्रे खाली ठेवेल आणि त्यानंतर इस्रायल १२ तासांत शस्त्रे खाली ठेवेले.
Iran-Israel Ceasefire: डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा: माझ्यामुळेच शांतता, दोन्ही देशांनी संपर्क साधला!