देवीच्या 'या' मंदिरात हजारो वर्षांपासून अखंड जळत आहे 'ही' अलौकिक ज्योत; जिथे पडली होती माता सतीची जीभ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील ज्वाला देवी मंदिरात पाण्यातही जळणारी शाश्वत ज्योत आजही भक्तांचा श्रद्धास्थान आहे.
सम्राट अकबराने ज्वाला विझवण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरला, उलट त्याचा अहंकार देवीने मोडून काढला.
नवरात्रीत लाखो भाविक येथे येऊन माता सतीच्या जीभेच्या शक्तीपीठाचे दर्शन घेतात, जे जगप्रसिद्ध आहे.
jwalamukhi temple himachal pradesh : हिमाचल प्रदेशाला ‘देवभूमी'(Devbhoomi) म्हणून ओळखले जाते. इथल्या पर्वतरांगांमध्ये दडलेली अनेक शक्तीपीठं भक्तांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र आहेत. अशाच शक्तीपीठांपैकी एक म्हणजे ज्वालामुखीतील ज्वाला देवी मंदिर (jwalamukhi temple himachal pradesh) , जे हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात वसलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हजारो वर्षांपासून अखंड जळत असलेली नैसर्गिक ज्वाला, जी पाण्यातही विझत नाही.
पुराणकथेनुसार, भगवान शिवाच्या तांडवाला थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी माता सतीचे शरीर तुकडे केले. तिची जीभ या स्थळी पडली, आणि तेव्हापासून इथे नैसर्गिक ज्वाला जळत राहिली आहे. म्हणतात की अग्नी तत्वाशी संबंधित असल्याने ही ज्वाला कधीच विझत नाही. गर्भगृहात नऊ पवित्र ज्वाला सतत प्रज्वलित राहतात. ज्याचं दर्शन झालं, त्याचे दुःख-दरिद्र दूर होतात, असा लोकांचा विश्वास आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Palestine BRICS : ‘पॅलेस्टाईन ब्रिक्सकडे वाटचाल करताना…’; ‘असे’ झाल्यास जागतिक राजकारणाचे संपूर्ण समीकरण बदलणार
इतिहासात या मंदिराचा उल्लेख अनेकदा येतो. मुघल सम्राट अकबर जेव्हा आपल्या सामर्थ्याच्या गर्वात होता, तेव्हा त्याने या ज्वालेचा चमत्कार तपासण्याचे ठरवले. त्याने लोखंडी कड्या बसवून कालव्याचे पाणी मंदिरात वळवले. परंतु ज्वाला मात्र कणभरही न विझता प्रज्वलित राहिली.
यानंतर अकबराने सोन्याची छत्री अर्पण केली. त्याला वाटले की इतकी मौल्यवान भेट दुसरा कोणी देऊ शकणार नाही. पण देवीने त्याचा अभिमान स्वीकारला नाही. ती छत्री लगेच साध्या धातूमध्ये रूपांतरित झाली. हा प्रसंग आजही मंदिरात श्रद्धेने सांगितला जातो.
नवरात्रीच्या काळात या मंदिराला लाखो भाविक भेट देतात. माँ ज्वालाची आरती, दर्शन, आणि अखंड दिव्य ज्योतीचे तेज पाहताना भक्तांना अध्यात्मिक उर्जा मिळते. ‘पाण्यातही न विझणारी ही ज्योत’ भक्तांसाठी फक्त चमत्कार नाही, तर त्यांची श्रद्धा, आत्मविश्वास आणि अढळ भक्ति याचे प्रतीक आहे.
मंदिरातील आरती ऋतूनुसार ठरवली जाते.
सकाळची मंगला आरती : पहाटे ५ वा. किंवा ६ वा.
भोग आरती : सकाळी ११:३० वा. ते दुपारी १२:३० वा.
संध्याकाळची आरती : सायं ७ वा. किंवा ८ वा.
शयन आरती : रात्री ९:३० वा. किंवा १० वा.
हिवाळ्यात या वेळेत थोडाफार फरक होतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Imam Khomeini Spaceport : ‘युद्धानंतरही इराण आक्रमकच…’; उपग्रह प्रतिमांद्वारे उघडकीस आली गुप्त माहिती समोर
विमानमार्गे : जवळचे विमानतळ गग्गल (५० किमी).
रेल्वेमार्गे : जवळचे नॅरोगेज स्टेशन, ज्वालाजी रोड (२० किमी). ब्रॉडगेज : पठाणकोट (१२० किमी).
रस्त्यामार्गे : दिल्ली, चंदीगड, धर्मशाळा येथून बस व टॅक्सी सहज उपलब्ध. डोंगराळ प्रवासात अप्रतिम दृश्यांचा अनुभव मिळतो.
मंदिराजवळ साध्या धर्मशाळांपासून ते आलिशान रिसॉर्टपर्यंत सर्व पर्याय आहेत. भाविकांना त्यांच्या बजेटनुसार राहण्याची सोय मिळते. हिमाचलचे हे अद्भुत मंदिर श्रद्धा, अध्यात्म आणि इतिहास यांचा संगम आहे. पाण्यातही न विझणारी ही ज्वाला भक्तांसाठी अनमोल आस्था आहे. नवरात्रीत जर तुम्ही देवभूमीकडे निघाला असाल, तर ज्वालामुखीच्या या पवित्र शक्तीपीठाला नक्की भेट द्या. इथे मिळणारी उर्जा, शांतता आणि भक्तिभाव आयुष्यभर लक्षात राहील.