Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ला तुर्तास रोखला; शांतात चर्चेसाठी दिली संधी, युद्ध थांबणार?

Middle East Conflict : ट्रम्प यांनी इराणवर आज होणार लष्करी हल्ला रोखला आहे. यामुळे मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सध्या इराण यावर काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 10:01 AM
Middle East Conflict Trump Postpones Iran Military Attack After Gulf Nations Appeal

Middle East Conflict Trump Postpones Iran Military Attack After Gulf Nations Appeal

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ला तुर्तास रोखला
  • शांतात चर्चेसाठी दिली संधी
  • युद्ध थांबणार?
Trump Postponed Iran Attack : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान एक अत्यंत दिलासादायक वृत्त मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवरील हल्ला तात्पुरता रोखला आहे. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांनी केलेल्या विशेष आवाहानानंतर ट्रम्प यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इराणला शांतता चर्चेसाठी आणखी संधी देत असल्याचे म्हटले आहे.

US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद

आखाती देशांची मध्यस्थी

ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया अकाऊंटवर या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कतार, सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि यूएई या आखाती मित्रराष्ट्रांनी अमेरिकेला इराणवर लष्करी कारवाई न करण्याची आग्रहाची विनंती केली होती. यामुळे इराणवरील हल्ला काही काळासाठी रोखला जात आहे. सध्या इराणशी पडद्यामागे सकारात्म आणि अत्यंत गंभीर चर्चा सुरु आहे. थेट हल्ला झाल्यास परिस्थिती बिघडू शकते. अशी या देशांनी भीती व्यक्त केली होती.

ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

परंतु इराणवरील हल्ला तुर्तास टळला असला तरी ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, या शांतता चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही तर, अमेरिका (America) इराणवर पूर्ण ताकदीने हल्ला करेल. अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून कतार, सौदी आणि युएई(UAE) वर इराण वारंवार हल्ले करत आहे. या देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले जात होते. परंतु इराणने या देशांच्या महत्त्वपूर्ण उर्जा केंद्र आणि पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले. यामुळे आपल्या नागरिकांच्या आणि उर्जा सुरक्षेसाठी या तिन्ही देशांनी पुढाकार घेऊन अमेरिकेला हल्ला रोखण्याची विनंती केली.

पाकिस्तानची भूमिका

या संपूर्ण वादात पाकिस्तान अमेरिका-इराणमध्ये मध्यस्थी म्हणून कार्य करत आहे. पाकिस्तानने मे महिन्याच्या सुरुवातील इराणचा १४ कलमी प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडला होता. परंतु याला ट्रम्प यांनी धुडकावून लावले होते.  परंतु दोन्ही देशांतील वाद इराणच्या युरेनियम संवर्धन आणि अण्वस्त्र साठ्यांवरुन कायम आहे. शिवाय ट्रम्प सतत इराणला हल्ल्याचा इशारा देत आहेत. सध्या इराण (Iran) यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


US Iran Tension : ‘वादळापूर्वीची शांतात’ , ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग आणखी गडद

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ला अचानक का थांबवला?

    Ans: कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांनी केलेल्या विशेष आवाहानानंतर इराणवरील लष्करी हल्ला तात्पुरता थांबवण्यात आला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • Que: अमेरिका इराण वाद कोणता कारणावरुन पेटला आहे?

    Ans: इराणला त्यांचा समृद्ध युरेनियमचा साठा अमेरिकेकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे थांबवावा असेही अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, इराणने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. यामुळे दोन्ही देशांतील वाद अधिक पेटला आहे.

Web Title: Middle east conflict trump postpones iran military attack after gulf nations appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
1

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
2

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
3

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL
4

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.