ढाकामध्ये गाझाच्या समर्थनार्थ 10 लाख मुस्लिमांचा जिहादचा जयघोष; नेतन्याहू यांच्या पोस्टरवर चप्पलांचा वर्षाव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका (बांगलादेश) : इस्रायलच्या गाझा पट्टीतील कारवायांवरून संपूर्ण इस्लामी जगतात संतापाची लाट उसळलेली असताना बांगलादेशात ती प्रचंड रूपात दिसून आली. राजधानी ढाकामध्ये सुमारे १० लाख मुस्लिम नागरिकांनी गाझाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढत इस्रायलविरोधात ‘जिहाद’चे आवाहन केले. नेतन्याहू यांच्या पोस्टरवर चप्पल आणि काठ्यांनी मारून संताप व्यक्त करण्यात आला.
ही भव्य रॅली ढाका विद्यापीठ कॅम्पसजवळील सुहरावर्दी पार्कमध्ये आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. निदर्शकांनी हातात पॅलेस्टाईनचे झेंडे आणि ‘खलिफतचा ध्वज’ असलेले बॅनर्स घेतले होते. यावेळी “आझाद पॅलेस्टाईन”, “नेतन्याहू मुरदाबाद”, “इस्रायलचा नाश होवो” यांसारखे घोषणाबाजीही करण्यात आली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युक्रेन दोन भागात विभागले जाणार! काय आहे ट्रम्पच्या दूताचा ‘प्रस्ताव’ आणि पुतिनची ‘खळबळजनक’ प्रतिक्रिया?
“On the streets of Dhaka, the cries of Gaza echo today, as millions march in an unyielding protest against oppression! Our hearts burn with the light of humanity, our voices roar with the demand for justice—for Gaza, for freedom, for the hope of a new dawn!
March For Gaza pic.twitter.com/2mkfkQV1SR— Shakil Shakawat (@ShakilSobohan) April 12, 2025
credit : social media
या रॅलीचे आयोजन बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि विविध इस्लामिक गटांनी एकत्रितपणे केले होते. बीएनपी नेत्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीत अनेक धार्मिक संघटनांनी भाग घेतला. इस्लामिक नेत्यांनी इस्रायलविरोधात भाषणांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला आणि गाझातील पॅलेस्टिनींच्या हत्याकांडाला ‘मानवतेविरोधी गुन्हा’ असे संबोधले.
या आंदोलनात केवळ घोषणाच नाहीत, तर इस्लामिक नेत्यांनी इस्रायलविरोधात ‘जिहाद’ची हाक दिली. “हे केवळ संघर्ष नाही, तर आमच्या विश्वासाचा प्रश्न आहे,” असे म्हणत शेकडो मौलानांनी ‘जिहादसाठी लब्बैक’चा नारा दिला. पाकिस्तानमधील मुफ्ती तकी उस्मानी यांनी तर लोकांना तीर्थयात्रेचे पैसे पॅलेस्टिनी संघर्षासाठी दान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या सभेतही हजारोंचा जमाव उपस्थित होता.
बांगलादेश हा मुस्लिम बहुल देश असून, त्याचे इस्रायलशी कोणतेही औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत. बांगलादेशाने कायमस्वरूपी पॅलेस्टिनियन स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवलेला आहे, आणि इस्रायलच्या कारवायांचा जाहीर निषेध केलेला आहे. या पार्श्वभूमीवर, ढाकामधील ही रॅली केवळ बांगलादेशापुरती मर्यादित नसून, संपूर्ण मुस्लिम जगताचा रोष प्रतिबिंबित करणारी ठरते.
गाझाच्या समर्थनार्थ बांगलादेशात विविध राजकीय व धार्मिक पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येणे, ही एक मोठी घटना मानली जाते. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, सर्वच इस्रायलविरोधात एकत्र आल्याचे या निदर्शनातून दिसून आले. त्यामुळे ही रॅली केवळ निदर्शन नसून, इस्रायलविरोधातील सामूहिक संतापाची उग्र अभिव्यक्ती ठरली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळमधील बीरगंजमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक, तणावग्रस्त परिस्थिती; संपूर्ण शहरात कर्फ्यू लागू
बांगलादेशातील या आंदोलनामुळे गाझाच्या पॅलेस्टिनीयन जनतेच्या बाजूने इस्लामी जगताची एकजूट अधोरेखित झाली आहे. ढाकामध्ये लाखो लोकांनी एकत्र येत इस्रायलविरोधातील रोष उघडपणे व्यक्त केला आहे. ही एक राजकीय, धार्मिक आणि सामाजिक आंदोलनाची प्रबळ प्रतिक्रिया आहे, जी भविष्यात जागतिक पातळीवर आणखी तीव्र रूप धारण करू शकते. फिलहाल, बांगलादेशात इस्रायलविरोधात जिहादचा नारा गुंजतोय, आणि नेतन्याहू यांच्या पोस्टरवर चप्पलांचा वर्षाव होत आहे – ही केवळ प्रतीकात्मक प्रतिक्रिया नसून, संपूर्ण मुस्लिम समाजातील खोल असंतोषाचे प्रतिनिधित्व आहे.