३००० वाहने जळून राख, इलेक्ट्रिक कारमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण जहाज समुद्रात बुडाले (फोटो सौजन्य-X)
morning midas ship sinks news in Marathi : अलास्काजवळ एक मोठी सागरी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याने संपूर्ण मालवाहू जहाज समुद्रात बुडाले. ही दुर्घटना ‘मॉर्निंग मिडास’ नावाच्या जहाजावर घडली, जे चीनहून मेक्सिकोला सुमारे ३,००० वाहने घेऊन जात होते. या जहाजात सुमारे ८०० इलेक्ट्रिक वाहने देखील होती.
ब्लूमबर्ग न्यूजच्या वृत्तानुसार, ३ जून रोजी जहाज अलास्काच्या नैऋत्येस ३०० मैल (सुमारे ४९० किलोमीटर) अंतरावर असताना हा अपघात झाला. जहाजाच्या डेकवरून धूर निघताना दिसला, त्यानंतर आग वेगाने पसरली. खराब हवामान आणि आत पाणी शिरल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आणि अखेर २३ जून रोजी जहाज बुडाले.
जहाजाच्या व्यवस्थापन कंपनी झोडियाक मेरीटाईमने सांगितले की, इलेक्ट्रिक वाहने ठेवलेल्या डेकमधून प्रथम धूर निघत होता. आग इतकी भीषण होती की जहाजावरील सर्व २२ क्रू सदस्यांना रेस्क्यू बोटीद्वारे बाहेर काढावे लागले. दिलासा म्हणजे सर्व २२ क्रू सदस्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले.
‘मॉर्निंग मिडास’ जहाज ६०० फूट (१८३ मीटर) लांब होते आणि २००६ मध्ये बांधले गेले होते आणि २६ मे रोजी चीनच्या यंताई येथून निघाले होते. त्याचे गंतव्यस्थान मेक्सिकोमधील एक मोठे बंदर होते. जहाज बुडण्यापूर्वी गाड्या उतरवल्या गेल्या होत्या की नाही हे आता स्पष्ट झालेले नाही, परंतु या अपघातामुळे पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
जहाजावरील एकूण २२ क्रू मेंबर्सना लाईफबोट्सद्वारे वेळेत बाहेर काढण्यात आले. तेथून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजाने त्यांना सुरक्षितपणे वाचवले. मोठी गोष्ट म्हणजे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत.
या अपघातात सुमारे ३,००० नवीन कार पॅसिफिक महासागरात बुडाल्या. ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या वाहनांमध्ये ७० पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि ६८० हायब्रिड कारचा समावेश होता. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आग इलेक्ट्रिक वाहने ठेवलेल्या डेकमधून सुरू झाली. यामुळे ईव्ही बॅटरीमधून आग पसरण्याची शक्यता असल्याची भीती आणखी वाढली आहे.
सध्या जहाज बुडाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे सागरी प्रदूषण झाल्याचे वृत्त आलेले नाही. यूएस कोस्ट गार्डने माहिती दिली आहे की घटनास्थळी दोन विशेष साल्वेज टग आणि एक प्रदूषण प्रतिसाद जहाज तैनात करण्यात आले आहे. या पथके तेल गळती, जहाजाचा ढिगारा किंवा इतर कोणत्याही पर्यावरणीय धोक्यासाठी सतत लक्ष ठेवून आहेत.
मॉर्निंग मिडास हे ६०० फूट लांबीचे मालवाहू जहाज होते, जे २००६ मध्ये बांधले गेले होते. हे जहाज लायबेरियामध्ये नोंदणीकृत होते आणि २६ मे रोजी चीनच्या यंताई बंदरातून निघाले. त्याचे गंतव्यस्थान मेक्सिकोमधील एक प्रमुख बंदर होते, परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच ते समुद्रात कोसळले.