नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपातील (Nepal earthquak) मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापूर्वी 128 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता ही संख्या 132 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बचाव दल बचाव कार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
[read_also content=”मुकेश अंबानी यांना धमकी येण्याचं सत्र सुरूचं, दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामाचा दिला इशारा! https://www.navarashtra.com/maharashtra/death-threat-to-mukesh-ambani-again-demanding-400-crore-nrps-477672.html”]
शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास नेपाळच्या पश्चिम भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजण्यात आली आहे. नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू जाजरकोटमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी काल रात्री या जाजरकोटमध्ये भागात झालेल्या भूकंपामुळे बाधित झालेल्या लोकांची त्यांनी भेट घेतली. भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शुक्रवारी रात्री 11.47 वाजता जाजरकोटच्या रामीदांडा येथे झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि घरांच्या हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना तात्काळ बचाव आणि मदतीसाठी तिन्ही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.
#WATCH | Nepal PM Pushpa Kamal Dahal ‘Prachanda’ arrives in Jajarkot and meets the people affected by the earthquake that struck the region last night.
The death toll in the 6.4 magnitude earthquake stands at 129.
(Video Source: Reuters) pic.twitter.com/sty7recDgR
— ANI (@ANI) November 4, 2023