शपथविधीआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भातील खटल्यात कोर्टाचा मोठा निर्णय; हश मनी प्रकरणात ट्रम्प...
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शपथविधीआधी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हश मनी प्रकरणात न्यायालयाने सर्व ३४ आरोपांमधून निर्दोष मुक्त केलं आहे. तसंच न्यायालयाने त्यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. निकाल देताना न्यायाधीश मर्चन यांनी या प्रकरणाला एक असाधारण प्रकरण म्हटलं आहे. या प्रकरणात मोठा विरोधाभास आहे. या प्रकरणाने माध्यमांमध्ये ठळक बातम्या दिल्या पण न्यायालयात मात्र प्रकरण वेगळंच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
निकालापूर्वी ट्रम्प न्यायालयात बाजू मांडताना म्हणाले, मला खूप वाईट वागणूक मिळाली. मी पुन्हा पुन्हा तेच सांगेन, माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत. मी तुमचा खूप खूप आभारी असल्याचं ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्पवर काय आरोप होते?
२०१६ मध्ये, ट्रम्प यांच्यावर एका घोटाळ्यापासून वाचण्यासाठी एका स्टारला $१३०,००० दिल्याचा आरोप होता. आरोप असा होता की त्याने हे पैसे त्या स्टारला त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगण्यासाठी दिले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. दरम्यान शुक्रवारी ट्रम्प व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयीन सुनावणीत हजर झाले.सुनावणीदरम्यान आणि नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तनाचा अभियोक्ता स्टीनग्लास यांनी निषेध केला. त्यांनी सांगितले की ट्रम्प यांनी या खटल्याची वैधता कमी करण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यांनी ट्रम्प यांच्या अनेक विधानांचाही उल्लेख केला ज्यात त्यांनी म्हटले होते की त्यांना या प्रकरणात अडकवले जात आहे.
एवढेच नाही तर, अभियोक्त्याने त्यांच्या विधानाचाही उल्लेख केला ज्यामध्ये ट्रम्प यांनी जिल्हा वकील कार्यालयाला भ्रष्ट म्हटले होते. स्टीनग्लास यांनी न्यायालयाला सांगितले की ट्रम्प यांनी न्यायालये आणि फौजदारी न्यायिक प्रक्रियेवर हल्ले सुरू केले आहेत. याचा न्यायालयाबाहेरही व्यापक परिणाम झाला. ट्रम्प यांनी फौजदारी न्यायिक प्रक्रियेबद्दल लोकांची मन दुखावल्याचा आरोप त्यांनी केला.
हश मनी प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांची शिक्षा पुढे ढकलण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले होते. या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या होत्या. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला १.३ लाख डॉलर्स दिल्याप्रकरणी ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ट्रम्प यांचं आव्हान फेटाळून लावलं होतं. न्यायाधीश जुआन एम मार्चेन यांना शुक्रवारी शिक्षा सुनावण्याची परवानगी दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी हुश मनी प्रकरणी शिक्षेला स्थगिती देण्याच्या केलेल्या आवाहनावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.
हश मनी प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी 2006 मध्ये स्टॉर्मी डॅनियल्सला तिचे नाते लपवण्यासाठी हश पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. न्यू यॉर्क न्यायालयांनी ट्रम्प यांना 34 गुन्ह्यांमध्ये खोटे व्यवसाय रेकॉर्डसाठी दोषी ठरवले, जे त्यांच्या वैयक्तिक बाबींशी संबंधित आहेत आणि राष्ट्रपतींच्या अधिकृत कर्तव्यांशी संबंधित नाहीत.