व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवाईत ३२ अधिकारी ठार; क्युबन सरकारने निवेदन जारी केले, दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
32 Cuban officers killed in Venezuela : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो ( Nicolas Maduro) यांना अटक करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या धडाकेबाज लष्करी कारवाईचे पडसाद आता संपूर्ण जगात उमटत आहेत. या कारवाईत केवळ मादुरो यांनाच अटक करण्यात आली नाही, तर त्यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेले क्युबाचे ३२ लष्करी आणि पोलीस अधिकारी ठार झाले आहेत. क्युबन सरकारने रविवारी (४ जानेवारी २०२६) अधिकृतपणे या मृत्यूची पुष्टी केली असून, या घटनेमुळे लॅटिन अमेरिकेत तणाव शिगेला पोहोचला आहे.
क्युबाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मारले गेलेले अधिकारी व्हेनेझुएला सरकारच्या अधिकृत विनंतीवरून तिथे तैनात होते. हे अधिकारी एका ‘विशेष मोहिमेवर’ (Special Mission) काम करत होते. अमेरिकन कमांडोजनी जेव्हा मादुरो यांच्या निवासस्थानी आणि लष्करी तळावर छापा टाकला, तेव्हा झालेल्या भीषण चकमकीत हे ३२ अधिकारी जागीच ठार झाले. क्युबाने आपल्या या जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी दोन दिवसांचा ‘राष्ट्रीय शोक’ जाहीर केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade War: ‘त्यांना मला खूश करायचे होते… ‘PM Modi आणि Trump यांच्यात ‘ऑइल’वरून ठिणगी; USने पुन्हा उगारली Tariff तलवार
फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला परतताना ‘एअर फोर्स वन’ विमानात पत्रकारांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मृत्यूंविषयी भाष्य केले. ट्रम्प म्हणाले, “तुम्हाला माहित आहेच, कालच्या कारवाईत मोठ्या संख्येने क्युबन लोक मारले गेले आहेत. शत्रूच्या बाजूला प्रचंड जीवितहानी झाली आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचा एकही जवान या कारवाईत शहीद झालेला नाही.” ट्रम्प यांच्या या विधानाने क्युबा आणि अमेरिका यांच्यातील शत्रुत्व आता अधिक गडद झाले आहे.
The Cuban government said 32 of its officers died during the United State’s action in Venezuela over the weekend. President Donald Trump on Sunday said that the Cuban individuals killed were serving as bodyguards to ousted Venezuelan leader Nicolás Maduro. MORE:… pic.twitter.com/a7f3tqDJrN — NewsNation (@NewsNation) January 5, 2026
credit : social media and Twitter
अमेरिकेने ३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ‘ऑपरेशन अॅब्सोल्यूट रिझॉल्व’ अंतर्गत व्हेनेझुएलाच्या राजधानीत प्रवेश केला. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेताना क्युबन सैनिकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु अमेरिकेच्या आधुनिक शस्त्रास्त्रांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. मादुरो यांच्यावर सध्या अमेरिकेत ‘नार्को-टेररिझम’चे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना न्यूयॉर्कच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप
क्युबाचे विद्यमान अध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल आणि क्रांतिकारी नेते राउल कॅस्ट्रो यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मृत अधिकाऱ्यांची नावे अद्याप गोपनीय ठेवण्यात आली आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबियांना सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हेनेझुएला सरकारनेही अमेरिकन हल्ल्यात जीवितहानी झाल्याची कबुली दिली असली, तरी त्यांनी निश्चित आकडा अद्याप जाहीर केलेला नाही.
Ans: क्युबन सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, ३ जानेवारीच्या अमेरिकन लष्करी कारवाईत ३२ लष्करी आणि पोलीस अधिकारी ठार झाले आहेत.
Ans: मृत अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ क्युबाने दोन दिवसांचा (५ आणि ६ जानेवारी) राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.
Ans: ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण मोहिमेदरम्यान अमेरिकेचा एकही सैनिक मारला गेलेला नाही.






