या देशात २०२५ सुरूही झालं; नागरिकांनी नवीन वर्षाचं केलं जोरदार स्वागत
नववर्षाच्या स्वागतासाठी अवघं जग सज्ज झालं आहे. 2025 च्या स्वागताची उलटी गिनती सुरू झाली आहे. हा क्षण साजरा करण्यासाठी आणि भूतकाळाला मागे सोडून पुन्हा नव्या उम्मेंदीने जगण्यासाठी सेलीब्रेशन सुरू झालं आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या टाइम झोनमुळे, प्रत्येक देशाचे नवीन वर्ष वेगवेगळ्या वेळी सुरू होतं. नवीन वर्ष प्रथम किरीतीमाती बेटावर साजरं करण्यात आले. हे बेट किरिबाटी प्रजासत्ताकाचा भाग आहे. ते भारतापेक्षा 7.30 तास पुढे आहे. एकूण 41 देश भारतापूर्वी नवीन वर्ष साजरे करतात. न्यूझीलंडमधील रहिवाशांनीही 2025 चं जोरदार स्वागत केलं आहे.
भारतात 31 डिसेंबरच्या मध्यरात्री घड्याळाची टीकटीक वाजत असताना, न्यूझीलंडच्या नागरिकांना मोठ्या उत्सवांसह नवीन वर्षाचं स्वागत केलं. 2025 मध्ये प्रवेश करणारा न्यूझीलंड जगातील पहिला देश बनला. न्यूझीलंडच्या सर्वात मोठ्या शहरात, ऑकलंडमध्ये, प्रतिष्ठित स्काय टॉवर उत्सवाचा केंद्रबिंदु बनला होता. आकर्षक फटाक्यांची रोषणाईने शहरांचा नजारा बघण्यासारखा होता. हजारो रंगांनी आकाश उजळून निघालं होतं.
उत्सव केवळ ऑकलंडमध्ये नव्हता. वेलिंग्टनमध्ये, लाइव्ह म्युझिक, स्ट्रीट परफॉर्मन्स आणि नेत्रदीपक लाइट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. क्राइस्टचर्च आणि क्वीन्सटाउनमध्येही अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आधुनिक आणि पारंपरिक उत्सवांचं सांस्कृतिक मिश्रण पहायला मिळालं. या उत्सवाचा भाग होण्यासाठी जगभरातील पर्यटक न्यूझीलंडमध्ये दाखल झाले होते.ऑस्ट्रेलियाच्या दोन तास आधी न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत होतं. सिडनी हार्बरवर दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती.