• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Operation Sindoor Army Hits Pahalgam Attack Planning Site

Operation Sindoor First Video: पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना आखली ‘ती’ जागा केली भारतीय सैन्याने उद्ध्वस्त

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई प्रहार करून, त्या अड्ड्यांना जमीनदोस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 07, 2025 | 08:48 AM
Operation Sindoor Army hits Pahalgam attack planning site

Operation Sindoor First Video: पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना कुठे आखण्यात आली होती, भारतीय सैन्याने हवाई हल्ल्यात ती जागा कशी उद्ध्वस्त केली, पहिला व्हिडिओ पहा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Operation Sindoor : भारताने अखेर पहलगाममधील निर्दोष नागरिकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई प्रहार करून, त्या अड्ड्यांना जमीनदोस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्याच्या ठिकाणांचा व्हिडिओ संरक्षण खात्याने प्रसारित केला असून, दहशतवादी कारवायांची केंद्रे कशी उद्ध्वस्त झाली हे त्यातून दिसून येते.

दहशतवाद्यांच्या मूळ केंद्रांवर अचूक हल्ला

‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताची अत्यंत नियोजित आणि लक्ष केंद्रित कारवाई होती. पाकिस्तानातील बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटली आणि इतर ठिकाणी असलेल्या जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण तळ या कारवाईचा मुख्य हेतू होते. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने बहावलपूरमधील जामी मस्जिद सुभानअल्लाहवर हल्ला केला, ही मशिद जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मानली जाते. याशिवाय कोटली येथील हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र आणि मुझफ्फराबादमधील लष्करचे प्रशिक्षण तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Operation Sindoor’ नंतर पाक पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पहिलीच प्रतिक्रिया; जम्मू-कश्मीरमध्ये अलर्ट, विमानसेवा विस्कळीत

नऊ ठिकाणी एकाच वेळी कारवाई

भारतीय संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, एकूण नऊ ठिकाणी अचूक हवाई हल्ले करण्यात आले. या ठिकाणांवरून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती. मंत्रालयाने स्पष्ट केले की, “ही कारवाई लक्ष्यित, मोजमापित आणि पूर्णतः न उत्तेजक स्वरूपाची होती.” कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलेले नाही. यामुळे भारताची संयमित पण ठाम भूमिका अधोरेखित झाली आहे.

#WATCH | Visuals from an undisclosed location in J&K as the Indian Armed Forces launched ‘Operation Sindoor’, hitting terrorist infrastructure in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir from where terrorist attacks against India have been planned and directed.… pic.twitter.com/3D20pDXkND — ANI (@ANI) May 6, 2025

credit : social media

पहलगाम हल्ल्याचा सूड

‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दहशतवादी संघटनांनी भारतीय भूमीवर केलेल्या या हल्ल्याचा निषेध करत सरकारने कठोर आणि निर्णायक कृतीचे वचन दिले होते, ते प्रत्यक्षात उतरवले गेले आहे.

हाफिज सईद आणि मसूद अझहरला थेट इशारा

या कारवाईत भारताने हाफिज सईद आणि मसूद अझहरच्या थेट तळांवर हल्ला केला आहे, जे भारतविरोधी दहशतवादी कारवायांचे मुख्य सूत्रधार मानले जातात. या तळांवरूनच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते आणि भारताविरुद्ध षड्यंत्र रचले जात होते.

भारताची स्पष्ट भूमिका, संयमात ताकद

ही कारवाई म्हणजे केवळ सूड नसून, भारताची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मजबूत भूमिका आहे. भारतीय लष्कराने संयम दाखवत केवळ दहशतवादी अड्ड्यांनाच लक्ष्य केले, कोणत्याही निष्पाप नागरिकांना धक्का पोहोचू नये याची काळजी घेतली. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, “ज्यांनी हल्ल्याची योजना आखली आणि अंमलात आणला, त्यांना जबाबदार धरले जाईल, हे आमचे वचन आम्ही पूर्ण करत आहोत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindoor: जय हिंद! भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike

 दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, दहशतवादाचा मुकाबला निर्धाराने आणि अचूकतेने करणे हाच मार्ग आहे. पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त करून, भारताने केवळ देशाच्या सुरक्षेची नव्हे, तर अंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात असलेल्या भूमिकेचीही प्रचीती दिली आहे. ही कारवाई भविष्यातील संभाव्य दहशतवादी हल्ल्यांना रोखण्याचा मजबूत इशारा मानली जात आहे. आणखी तपशील लवकरच उघड केले जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Operation sindoor army hits pahalgam attack planning site

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • jammu kashmir
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
1

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी
2

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
3

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक

65 वर्षानंतर पहिल्यांदाच…Ranji Trophy च्या इतिहासात झाला मोठा उलटफेर! जम्मू-काश्मीरने केला दिल्लीचा पराभव
4

65 वर्षानंतर पहिल्यांदाच…Ranji Trophy च्या इतिहासात झाला मोठा उलटफेर! जम्मू-काश्मीरने केला दिल्लीचा पराभव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

Nov 18, 2025 | 01:53 PM
वी ने परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव देण्यासाठी आणले टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच फॅमिली आयआर प्रपोजिशन

वी ने परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव देण्यासाठी आणले टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच फॅमिली आयआर प्रपोजिशन

Nov 18, 2025 | 01:42 PM
पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…

Nov 18, 2025 | 01:40 PM
खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट

खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट

Nov 18, 2025 | 01:39 PM
Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…

Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…

Nov 18, 2025 | 01:36 PM
शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड

शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड

Nov 18, 2025 | 01:35 PM
७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क

७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क

Nov 18, 2025 | 01:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.