पाकिस्तानातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानाच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका पोलीस ठाण्यावर दहशतवादी आत्मघाती हल्ला ( Blast In Pakistan) झाला असून, त्यात ६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य 16 जण जखमी झाले आहेत. हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
[read_also content=”आलिया पुन्हा एक बायोपिकमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत गाजवणार रुपेरी पडदा! https://www.navarashtra.com/movies/alia-bhatt-playing-role-of-anchor-in-upcoming-biopic-by-hnasal-mehta-nrps-488188.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात ही घटना घडली. डेरा इस्माईल खान जिल्हा आदिवासी बहुल दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्याला लागून आहे. येथील दरबान पोलीस स्टेशनवर हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, आत्मघातकी हल्लेखोराने त्याचे स्फोटकांनी भरलेले वाहन पोलिस स्टेशनच्या इमारतीत घुसवले. हल्ला करणारे सर्व दहशतवादी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा पाठवण्यात आला असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे. तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने पाकिस्तानमध्ये अनेक मोठे हल्ले केले आहेत. तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तानचे प्रवक्ते मुल्ला कासिम यांनी सांगितले की, हा आत्मघाती हल्ला होता. सध्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.






