फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम बलुचिस्तानमध्ये स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये बलुचिस्थानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर आत्मघाती विस्फोट करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटात 21 जणांचा मृत्यु झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाल्या माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा रेल्वेस्थानक नेहमी प्रवाशांनी गजबजलेले असते. यामुळे हल्ल्याच्या वेळी स्थानावर मोठी गर्दी होती.
स्फोट रेल्वे स्थानकाच्या बुकिंग ऑफिसमध्ये
पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, स्फोट रेल्वे स्थानकाच्या बुकिंग ऑफिसमध्ये झाला. अनेक नागरिक तिकीट घेण्यासाठी उभे होते. मीडिया रिपोर्टनुसार, या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याचे सांगितले जात आहे. या गटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्वरित जखीमींना जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून परिस्थिती गंभीर असल्याचे घटनास्थळावर देखील डॉक्टरांना बोलवण्यात आले आहे.
हे देखील वाचा- उत्तरी गाझामध्ये इस्त्रायलची हल्ल्यांची मालिका सुरूच; बॉम्बफेकमध्ये 10 जणांचा मृत्यु
मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्फोटात जखमी झालेले काही नागरिक गंभीर अवस्थेत आहेत. तसेच मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेला आत्मघाती हल्ला मानले आहे, तसेच तपास सुरू असून स्फोटामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर एक्सप्रेस सकाळी 9 वाजता पेशावरकडे रवाना होणार होती, मात्र त्याआधीच स्फोट झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. स्फोटामुळे प्लॅटफॉर्मच्या छताचेही नुकसान झाले आहे, आणि स्फोटाचा आवाज शहरातील दूरवरच्या भागातही ऐकू आला.
आत्मघाती हल्ला असल्याचा संशय- वरिष्ठ पोलिस अधीक्षक
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्फोटाचा स्वरूप निश्चित करण्यासाठी बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक ऑपरेशन्स क्वेट्टा मुहम्मद बलोच यांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. बलुचिस्तान प्रांतात अशांतता आणि दहशतवादाच्या घटनांमुळे सध्या परिस्थिती गंभीर बनली आहे. या प्रांतात वारंवार अशा हिंसक घटना घडत असतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह
या स्फोटामुळे क्वेटा शहरातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी असे हल्ले होणे ही पाकिस्तानसाठी गंभीर बाब आहे. सध्या घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आणि स्फोटाच्या मागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला आहे.
हे देखील वाचा- आग्रा-लखनऊ हायवे मार्गावर भीषण अपघात; बसची ट्रकला धडक, 5 जण ठार, 9 जखमी