पाकिस्तानातील कराची येथे इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या टेलिव्हिजन चॅनेलचे पत्रकार आणि अँकर इम्तियाज मीर यांची हत्या करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Pro-Israel Pakistan Journalist Murdered: पाकिस्तानमध्ये पत्रकार देखील सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानातील कराची येथील एका टेलिव्हिजन चॅनेलचे पत्रकार आणि अँकर इम्तियाज मीर यांची हत्या करण्यात आली. पत्रकार इम्तियाज मीर यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. सिंध प्रांताचे गृहमंत्री झियाउल हसन लांझर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. लांझर म्हणाले की, इस्रायलच्या समर्थनार्थ केलेल्या टिप्पण्यांमुळे मीरची हत्या करण्यात आली आहे.
मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हत्येप्रकरणी चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ज्यांनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. गृहमंत्र्यांनी सांगितले की, २१ सप्टेंबर रोजी कराचीच्या मालीर परिसरातील चॅनेलच्या ऑफिसमधून बाहेर पडताना इम्तियाज मीर यांच्यावर भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की मीरला इस्रायलचा कथित समर्थक मानल्यामुळे त्याला लक्ष्य करण्यात आले. मात्र या हत्येमुळे पाकिस्तानमधील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चार खून संशयितांना अटक
सिंध पोलिस महानिरीक्षक गुलाम नबी मेमन आणि कराची पोलिस प्रमुख जावेद आलम ओधो यांनी सांगितले की या हत्येमागे एक संघटित अतिरेकी नेटवर्क आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नसले तरी, हत्येचा सूत्रधार शेजारच्या देशात असल्याचे त्यांनी सांगितले. अटक केलेल्या चार संशयितांची ओळख अजलाल झैदी, शहाब असगर, अहसान अब्बास आणि फराज अहमद अशी झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्व जण लष्कर सरुल्लाह नावाच्या संघटनेशी संबंधित आहेत, जी बंदी घातलेल्या जैनबियून ब्रिगेडचा भाग असल्याचे मानले जाते. ही संघटना पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या अतिरेकी गटांपैकी एक आहे आणि विविध परदेशी नेटवर्कशी देखील तिचे संबंध आहेत. कराची पोलिसांसह दोन केंद्रीय गुप्तचर संस्थांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला: लांझर
गृहमंत्री लांझर म्हणाले की पत्रकार मीर यांची हत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे आणि सरकार अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करेल. त्यांनी आश्वासन दिले की गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल. दरम्यान, अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या नेटवर्क आणि परदेशी हँडलर्सपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पाकिस्तानमध्ये पत्रकारावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. एका अहवालानुसार, २०२४ पासून एकूण सहा पत्रकारांची हत्या झाली आहे.






