भारत-सौदी अरेबिया मैत्रीचा नवा अध्याय; पंतप्रधान मोदी आज जेद्दाला रवाना, क्राउन प्रिन्सची घेणार भेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 23 एप्रिल सौदी अरेबियात राहणार आहेत. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी या दौऱ्यासाठी नरेंद्र मोदींना आमंत्रित केले आहे. 2019 नंतर पंतप्रधान मोदींचा हा तिसरा सौदीअरेबियाचा दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदी आज दुपारी जेद्दाला पोहोचतील.
पंतप्रधानांचा जेद्दाला गेल्या 40 वर्षांतील पहिलाच दौरा असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (22 एप्रिल) पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी भारत आणि सौदी अरेबियाच सहा सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षरी करतील. तसचे काही इतर महत्वपूर्ण करारांना अंतिम स्वरुप देण्यासाठी चर्चा देखील करणार आहेत. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्म बिन सलमान अल सौद यांच्या भेट घेतील या भेटीदरम्याम हज यात्रेशी संबंधि मुद्द्यांवर, विशेष करुन भारतीय यात्रेकरुंच्या कोट्यावर चर्चा होणार आहे.
याशिवाय दोन्ही देशांमध्ये अंतराळ, उर्जा, आरोग्य, विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन, संस्कृती आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांतील करारांवर चर्चा होण्याची शक्य.ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरापर्यंत रियाधमध्ये सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु होत्या. यादरम्यान डझनभरहून अधिक सामंजस्य करारांवर चर्चा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी व्यापर, गुंतवणूक आणि संरक्षणाशी संबंधित अतिरिक्त करारांना अंतिम स्वरुप देण्याची प्रयत्न करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी (23 एप्रिल) पंतप्रधान मोदी भारतीय कामगारांना कामावर ठेवणाऱ्या कारखान्या भेट देणार आहेत. या दौऱ्यानंतर मे 2025 मध्ये पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.
सौदी अरेबियातील भारतीय राजदूत सुहेल अजाज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि सौदी अरेबियामधील कनेक्टिव्हिटीसाठी जेद्दाह एक महत्वपूर्ण शहर आहे. हे शहर दोन्ही देशांमधील व्यापारासाठी प्रमुख बंदर आहे. तसेच या ठिकणी मक्काचे प्रवेशद्वार देखील ाहे. अमरा आणि हज यात्रेसाठी येणार प्रत्येक व्यक्ती प्रथम जेद्दाल मार्गे मक्काला जातो.
हज यात्रा भारतीय मुस्लिमांसाठी अतिशय महत्वाची आहे. 2014 मध्ये हज यात्रेसाठी भारताचा कोटा 1,36,020 होता, त्यानंतर 2015 मध्ये तो 1,75,025 वाढवण्यात आला होता. हा कोटा दरवर्षी सौदी अरेबियाकडून निश्चित केला जातो. गेल्या वर्षी हज यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यामुळे या वर्षी हा कोटा कमी करण्यात आला होता. तसेच अनेक नवीन नियमनही लागू करण्यात आले होते. दरम्यान चर्चेनंतर यामध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताची सौदी अरेबियाशी वाढती जवळीक आता धार्मिक तीर्थयात्रेतही सुधारणा करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये भारतीय कोट्यात हज यात्रेसाठी 1,22,518 प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विमानांपासून ते मक्का-मदिना पर्यंतची वाहतूक, मीना कॅम्पमध्ये राहण्याची सोय, निवास, जेवण या सर्व व्यवस्था मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण होतील नवे पोप? ‘हे’ आहेत जगातील सर्वात मोठे पाच चर्चित चेहरे