फोटो सौजन्य: Gemini
भारतीय वाहन चालकांच्या सुरक्षेला पुढील स्तरावर नेण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) भारत NCAP 2.0 साठी एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केली आहे. AIS-197 रिव्हिजन 1 नावाचा हा नवीन प्रस्ताव ऑक्टोबर 2027 पासून अंमलात आणण्याची योजना आहे.
आतापर्यंत, भारत NCAP मध्ये एखाद्या कारची सुरक्षा प्रामुख्याने प्रौढ आणि मुलांच्या प्रवाशांच्या संरक्षणावर आधारित होती. परंतु, सरकारने चाचणीची व्याप्ती आणि स्टॅंडर्डमध्ये लक्षणीयरीत्या वाढवली आहेत. आता पाच वेगवेगळ्या सुरक्षा श्रेणींमधील स्कोअर एकत्रित करून कारला स्टार रेटिंग दिले जाईल. यामुळे प्रत्येक कारच्या सुरक्षिततेचे अधिक अचूक मूल्यांकन करणे शक्य होईल.
Toyota Fortuner ला फुटलाय घाम! Kia ची ‘ही’ Hybrid Car मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार
BNCAP 2.0 मध्ये सुरक्षा मूल्यांकनामध्ये सर्वाधिक महत्व क्रॅश टेस्टलाच (55%) दिले जाणार आहे. फरक इतकाच की, यापूर्वी कंपन्या मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि एअरबॅग्सच्या आधारावर सहज 5-स्टार रेटिंग मिळवू शकत होत्या; मात्र आता ते शक्य राहणार नाही.
नवीन सिस्टममध्ये पाच अनिवार्य आणि अधिक कठीण क्रॅश टेस्ट समाविष्ट करण्यात आले आहेत. यात कारचे स्ट्रक्चर, अपघातानंतरचे परिणाम आणि प्रवाशांची सुरक्षा या सर्वांची तपशीलवार टेस्टिंग होणार आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांना तांत्रिक सुधारणा करून गाडी अधिक सुरक्षित बनवणे अनिवार्य होणार आहे.
आता वाहनाची सुरक्षा फक्त त्याच्या बॉडी स्ट्रक्चरवर अवलंबून राहणार नाही, तर ADAS (Advanced Driver Assistance Systems) फीचर्सलाही महत्त्व दिले जाईल.
नवीन नियमांनुसार 10% स्कोर ADAS फीचर्ससाठी राखीव असेल, ज्यात ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन-कीपिंग, फ्रंट कोलिजन वॉर्निंग यांसारखे आधुनिक फीचर्स समाविष्ट आहेत.
Royal Enfield Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी डोक्यात ‘या’ गोष्टी फिट करून घ्या
या बदलामुळे कार्समध्ये आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि रस्ते अपघात आधीच टाळण्यास मदत होईल.
नवीन BNCAP 2.0 मध्ये पादचारी आणि दोनचाकी वाहनचालकांच्या सुरक्षेलाही विशेष महत्त्व दिले जात आहे.
यामध्ये वाहनाच्या फ्रंट सेक्शनची स्वतंत्र चाचणी केली जाईल, ज्यामुळे अपघाताच्या वेळी पादचारीच्या डोक्यावर किंवा पायांवर होणारी दुखापत कमी होईल.
याशिवाय, AEB (Automatic Emergency Braking) सिस्टममध्ये पादचारी आणि दुचाकींची ओळख पटवण्याची क्षमता देखील स्कोरचा भाग असेल. या श्रेणीला 20% महत्व देण्यात आले असून यामुळे वाहन कंपन्यांना त्यांच्या डिझाइनमध्ये सुधारणा करणे आवश्यक होईल.






