OpenAI कंपनीच्या सीइीओ पदावरुन हटवल्यानंतर सॅम ऑल्टमन यांनी मायक्रोसॉफ्टची धरली वाट

    चॅटजीपीटी ChatGPT तयार करणारी कंपनी ओपनएआयने (OpenAI ) शुक्रवारी सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवले. त्यांच्या जागी ओपनएआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मूर्ती (Mira Murati) सध्या अंतरिम सीईओ म्हणून काम देण्यात आलं आहे. तर, सॅम ऑल्टमन यापुढे काय करणार असा प्रश्न विचारला जात होता. आता त्यांच्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. सॅम ऑल्टमन यांनी मायक्रोसॉफ्ट जॅाईन केलं आहे. ते कंपनीच्या नवीन प्रगत AI संशोधन संघाचे नेतृत्व करतील. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी सोमवारी ही माहिती दिली. ऑल्टमन व्यतिरिक्त, ओपनएआयचे माजी अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन आणि इतर काही कर्मचारी देखील मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होतील.

    सत्या नडेला म्हणाले- ‘आम्ही ओपनएआयसोबतच्या आमच्या भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही Emmett Shear आणि OpenAI मधील नवीन कार्यसंघ जाणून घेण्यास आणि काम करण्यास उत्सुक आहोत. “सॅम आणि ग्रेग नवीन प्रगत AI संशोधन संघाचे नेतृत्व करण्यासाठी मायक्रोसॉफ्टमधील त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सामील होतील ही बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”