सॅम ऑल्टमन ओपनएआयमध्ये सीईओ म्हणून परत येणार, ग्रेग ब्रॉकमन देखील होणार सामील!

ओपनएआयमधून निघाल्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये सामिला झालेले ऑल्टमन म्हणाले की, मला ओपनएआय आवडते. रविवारी संध्याकाळी जेव्हा मी मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे स्पष्ट झाले की माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

  चॅटजीपीटी ChatGPT तयार करणारी कंपनी ओपनएआयने (OpenAI ) मागील आठवड्यात सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवले. त्यांच्या जागी ओपनएआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मूर्ती (Mira Murati) सध्या अंतरिम सीईओ म्हणून काम देण्यात आलं. यानंतर सॅम ऑल्टमन यांनी मायक्रोसॉफ्ट जॅाईन केल्याची बातमी समोर आली होती. तसेच, ऑल्टमन व्यतिरिक्त, ओपनएआयचे माजी अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन आणि इतर काही कर्मचारी देखील मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार असल्याचंही सांगण्यात येत होत. आता याबद्दल नवीन माहिती समोर येत आहे. सॅम ऑल्टमन (Sam Altman Rejoined) आणि ग्रेग ब्रॉकमन (Greg Brockman ) कंपनीत परतणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

  सॅन फ्रान्सिस्कोस्थित ओपनएआयने कंपनीने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही सॅम ऑल्टमन यांना नवीन प्रारंभिक मंडळाद्वारे सीईओ म्हणून ओपनएआयमध्ये परत आणण्यासाठी तत्त्वत: करार केला आहे. या संचालक मंडळात सेल्सफोर्सचे माजी सह-सीईओ ब्रेट टेलर, अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव लॅरी समर्स आणि Quora सीईओ अॅडम डी’अँजेलो यांचा समावेश असेल. 

  मागच्या आठवड्यात कंपनीतुन काढण्यात आलं 

  ओपनएआयने कंपनीने गेल्या शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होत की, “ओपन एआयचे नेतृत्व करण्याच्या ऑल्टमनच्या क्षमतेवर बोर्डाला यापुढे विश्वास नाही. त्यामुळे त्यांना सीईओ पदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतरओपन एआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती यांची तात्काळ प्रभावाने अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

  ऑल्टमन काय म्हणाले

  ओपनएआयमधून निघाल्यानंतर  मायक्रोसॉफ्टमध्ये सामिल झालेले सॅम ऑल्टमन म्हणाले की, मला ओपनएआय आवडते. रविवारी संध्याकाळी जेव्हा मी मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे स्पष्ट झाले की माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, आता “नवीन बोर्ड आणि सत्याच्या पाठिंब्याने, मी OpenAI वर परत येण्यास आणि Microsoft सोबतची आमची मजबूत भागीदारी वाढवण्यास उत्सुक आहे.”