समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
नेपाळ: नेपाळच्या काठमांडूपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिणेकडील दक्षिणकाली नगरपालिकेच्या फायरपिंग भागात एक भीषण अपघात घडला आहे. एक बस डोंगरावरुन कोसळून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये एका 8 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस 120 मीटर खोल डोंगरळार परिसरातून खाली कोसलून अपघात झाला.
2 जणांचा मृत्यू 41 जखमी
या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले. पोलिंसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 35 वर्षीय बस चालक आणि एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 3 ते 12 वयोगटातील 41 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश होता.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. बचाव पथकाने घटनास्थळी पोहल्यावर जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखले केले असून आठ विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांनी घरी पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित 32 विद्यार्थी आणि शिक्षकांना काठमांडूतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
अपघाताची चौकशी सुरू
या भीषण अपघाताते कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार, बसचा तोल सुटल्यामुळे चालकाने बसवरील नियंत्रण गमावले आणि त्यामुळे बस खोल दरीत कोसळली. तसेच, पोलिसांकडून गाडीचा वेग जास्त होता का याचाही तपास सुरू आहे. अपघाताच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
स्थानीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून एकच खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असून ते अत्यंत अस्वस्थ आहेत. हा अपघात अत्यंत हृदयद्रावक असून भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.