फोटो सौजन्य-एएनआय
ढाका : बांगलादेशातील हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास भाग पडले. त्यांना देशही सोडावा लागला. बांगलादेश सोडल्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी एक मोठं विधान केले आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांची जयंती आहे. त्यामुळे हसीना यांनी लोकांना बंगबंधू मेमोरियल म्युझियममध्ये जमण्यास शेख हसीना यांनी आवाहन केले आहे.
हेदेखील वाचा : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधापदाचा राजीनामा का दिला?; ‘ही’ आहेत पाच कारणे
बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर शेख हसीना यांचे पहिले विधान समोर आले आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांची जयंती आहे. हसीना यांनी लोकांना बंगबंधू मेमोरियल म्युझियममध्ये जमण्यास सांगितले. हा दिवस ‘राष्ट्रीय शोक दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने 15 ऑगस्टची राष्ट्रीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी एका हिंदू मंदिराला भेट दिली आहे.
दरम्यान, बांगलादेशातील हिंसाचारादरम्यान अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. सरकारी मालमत्ता जाळण्यात आल्या होत्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पण शेख हसीना यांच्या राजीनाम्याची कारणेही तशीच आहेत. बांगलादेशची आर्थिक स्थिती आधीच वाईट होती, पण या आंदोलनामुळे त्यात अधिकच भर पडली. तेथे बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे.
हेदेखील वाचा : शेख हसीना किती संपत्तीच्या आहे मालकीण; भारतात कसा चालवणार आपला खर्च, वाचा…सविस्तर !
बांगलादेशमध्ये शेख हसीना दीर्घकाळ सत्तेवर होत्या. अलीकडेच त्या पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हापासून बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी आणि संतापाची भावनाही वाढील लागली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते.