हिजाब नीट न घातल्यामुळे एका शिक्षकाने विद्यार्थिनींना अर्धे टक्कल (Hijab Controversy)बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना इंडोनेशियातील आहे. या घटनेवरून इंडोनेशियामध्ये खळबळ उडाली असून याला धार्मिक असहिष्णुतेशी जोडलं जात आहे. त्याचबरोबर या गोंधळानंतर आरोपी शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले असून पीडित मुलींच्या कुटुंबीयांची शाळेच्या वतीने माफीही मागितली आहे.
[read_also content=”धक्कादायक! 5 तासात 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनं हादरलं कोटा, आता रविवारी No Test, No Study जिल्ह्याधिकांऱ्यांचा आदेश https://www.navarashtra.com/india/2-teens-die-by-suicide-in-6-hours-in-kota-rajasthan-govt-asks-coaching-centers-to-halt-tests-nrps-450649.html”]
वृत्तानुसार, ही घटना इंडोनेशियाच्या पूर्व जावा बेटावरील लामोंगन शहराची आहे. गेल्या बुधवारी येथील एका सरकारी शाळेतील एका शिक्षकाने हिजाब नीट घातला नसल्यामुळे 14 मुलींचे अर्धे टक्कल मुंडन केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलींनी हिजाबखाली घातलेली टोपी घातली नव्हती, त्यामुळे त्यांचे केस दिसत होते. यामुळे संतापलेल्या शिक्षकाने हे पाऊल उचलले.
या घटनेनंतर कुटुंबियांचाशाळेत चांगलाच गोंधळ घालतं आरोपी शिक्षकाला पदावरून हटवण्याची मागणी केली. त्यानंतर तणाव वाढताना पाहून शाळेने आरोपी शिक्षकाला निलंबित केले. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की शाळेत हिजाब घालणे सक्तीचे नाही परंतु विद्यार्थिनींना हिजाबच्या खाली घातलेली टोपी घालण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून ते व्यवस्थित दिसावेत. या संपूर्ण घटनेबद्दल शाळेने माफी मागितली आहे. यासोबतच पीडित विद्यार्थिनींचे समुपदेशनही करण्यात येणार आहे, जेणेकरून या घटनेतून त्यांना मानसिकदृष्ट्या सावरता येईल.
इंडोनेशियामध्ये इस्लाम हा सर्वात मोठा धर्म आहे आणि कालांतराने तेथे पुराणमतवाद वाढत आहे. त्यामुळेच मुस्लिमबहुल भागातील शाळांमध्ये मुलींच्या ड्रेस कोडमध्ये हिजाब अनिवार्य करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा नियम सर्व धर्मातील विद्यार्थिनींना लागू आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्येही इंडोनेशियामध्ये अशा अनेक घटना समोर आल्या होत्या, जिथे विद्यार्थिनींना हिजाब न घातल्याबद्दल किंवा तो योग्य प्रकारे न घातल्याबद्दल शिक्षा देण्यात आली होती. इंडोनेशियामध्ये सहा प्रमुख धर्म मानणारे लोक राहतात, त्यामुळे इंडोनेशियातील अशा घटना धार्मिक असहिष्णुतेकडे बोट दाखवत आहेत.