इंडो-पॅसिफिकमधून ड्रॅगनचे वर्चस्व संपुष्टात येणार? ट्रम्प यांचा चीनविरोधात मोठा निर्णय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग: एकीकडे अमेरिकेसोबत चीनचे व्यापर युद्ध सुरु आहे, तर दुसरीकडे इंडो-पॅसिफिसकमदून ड्रॅगनचे वर्चस्व कमी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे चीन आणि अमेरिका संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय तैवानला अमेरिकेच्या मदतीवरुनही चीन-अमेरिकेत मोठा वाद आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात भारत हा चीनचा सर्वात मोठा मित्र आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण धोरणांसाठी अंडर सेक्रेटरी ऑफ डिफेन्ससाठी एल्ब्रिज कोल्बी यांना सिनेटने मान्यता दिली आहे. एल्ब्रिज कोल्बी यांचा सर्वात मोठा धोका चीनला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
ट्रम्प प्रशासनातील प्रभावी व्यक्तिमत्तव
ट्रम्प प्रशासनाती सर्वात प्रभावी आणि स्पष्ट व्यक्तीमत्तव म्हणून एल्ब्रिज कोल्बी यांना ओळखले जाते. त्यांनी नेहमीच युरोप, चीन आणि रशियाविरोधात विरोधी भूमिका बाळगली आहे. सध्या त्यांनी चीनचे इंडो-पॅसिफिकमधून वचर्स्व कमी करण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. यासाठी त्यांनी नवीन योजना आखली आहे.
चीन अमेरिकेसाठी मोठ्या धोका
कोल्बी यांनी चीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील अमेरिकन संबंधांसाठी मोठा धोका आहे. इंडो-पॅसिफिकमध्ये चीनचे वर्चस्व हे अमेरिकेच्या सुरक्षा, स्वातंत्र्य आणि समृद्धीवर गंभीर परिणाम करणारे आहे.
तैवानवरुन चीन-अमेरिकेत वाद
चीन आणि अमेरिकेत तैवानच्या नियंत्रणावरुन सतत वाद होत असतात. चीनच्या म्हणण्यानुसार, तैवान हा चीनचा भाग आहे. तर तैवानने नेहमीच स्वत:ला स्वंतत्र देश म्हणून संबोधले आहे. याच वेळी अमेरिकेने नेहमीच तैवानच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. चीनपासून सुरक्षा करण्यासाठी अमेरिकेने अनेकवेळा तैवानला लष्करी मदत केली आहे. मात्र, चीनने याला तीव्र विरोध केला आहे. अमेरिकेकडून तैवानला शस्त्रास्त्र पुरवठा केला जातो, यामुळे तैवानची लष्करी क्षमता वाढत आहे. अमेरिकेने तैवानला नेहमीच अनऔपचारिक पाठिंबा दिल्याने चीनने नाराजी व्यक्त केली आहे.
काय असेल एसल्ब्रिज कोल्बी यांची भूमिका
दरम्यान कोल्बी यांनी सध्या चीनविरोधात नवी लष्करी योजना आखली आहे, त्यांनी म्हटले की ही योजना चीनच्या अस्तित्वाला संपूर्णपण नष्ट करु शकते. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पाऊल चीनसाटी मोठे धोकादायक मानले जात आहे. एकीकडे चीन-अमेरिकेत व्यापार युद्ध आणि दुसरीकडे तैवानचा मद्दा यामुळे मोठे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा जागतिक स्तरावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.