पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो- ट्विटर)
इराण-अमेरिका, इस्त्रायल युद्ध पेटले
इराणचे कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र हल्ले
कॅनडाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर
सध्या जगावर युद्धाचे सावट आहे. मिडल ईस्ट भागात इराण विरुद्ध अनेक देश जोरदार युद्ध सुरू झाले आहे. कॅनडाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आहेत. मार्क कार्नी हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धावर भाष्य केले आहे. इराण-इस्त्रायल, अमेरिकेच्या युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे.
कॅनडा आणि भारत सरकारमध्ये अनेक महत्वाचे करार झाले आहेत. खनिज क्षेत्राशी संबंधित हे करार असल्याचे समोर येत आहे. कराराअंतर्गत कॅनडा भारताला युरोनियम पुरवणार आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मिडल ईस्टमधील युद्धाच्या परिस्थितीवर चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले आहे.
Addressing the joint press meet with PM Mark Carney of Canada.@MarkJCarney https://t.co/p0PVHPlw0k — Narendra Modi (@narendramodi) March 2, 2026
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
जगभरात अनेक ठिकाणी तणाव सुरू आहे. यावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी पुढे राहिलो आहोत. जेव्हा दोन लोकशाही असलेले देश सोबत एकत्र येतात, तेव्हा शांततेचा आवाज अधिक मजबूत होतो. पश्चिम आशियामध्ये असलेली आताची परिस्थिती आमच्यासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. भारत देश सर्व प्रकारचे वाद सोडवण्यासाठी संवाद आणि कूटनीतीला समर्थन करतो. या प्रदेशातील सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व देशांसोबत काम करत राहू असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला
मध्यपूर्वेतील तणावाने आता रौद्र रुप धार केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स आक्रमक झाले आहेत. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स या वाढत्या तणावादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाला लक्ष्य केले आहे. परंतु अद्याप इस्रायलकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
Iran Israel War : इस्रायलला इराणचं खुलं आव्हान! सीक्रेट बंकरचा जारी केला व्हिडिओ; अमेरिकाही हादरली
मध्य पूर्वे आशियात युद्धाचा जोरदार भडका उडालेले आहे. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त कारवाईमुळे इराण आक्रमक झाला असून अरब देशांवर हल्ले करत आहे. अरब देशातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. याच दरम्यानचे इराणने एक खळबळजनक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था फार्स ने हा व्हिजिओ जारी केला असून इस्रायल आणि अमेरिकेला खुले आव्हान मानले जात आहे.






