नुकत्याच झालेल्या विनाशकारी भूकंपापासून (Turkey Syria Earthquake) तुर्की आणि सीरिया सावरण्याच प्रयत्न करत आहेत, परंतु मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे मृतांचा आकडा आता ४१,००० च्या पुढे गेला आहे. एकट्या तुर्कीमध्ये या भीषण भूकंपामुळे 38,044 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सीरियामध्ये 3,688 लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी या भूकंपाला ‘शताब्दीतील आपत्ती’ म्हटले आहे. या भीषण भूकंपामुळे सर्वात जास्त विध्वंस तुर्कीमध्ये झाला आहे.
[read_also content=”जगभरातल्या दिग्गज कंपन्याची धुरा भारतीयांच्याच हाती! भारतीय वंशाचे नील मोहन यूट्यूबचे नवे सीईओ, सुंदर पिचाई यांच्यासोबत करणार काम https://www.navarashtra.com/world/who-is-neal-mohan-an-indian-american-to-become-ceo-of-youtube-nrps-370210.html”]
तुर्कस्तान-सीरियात झालेल्या भीषण भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर जगभरातील देश तुर्कीच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. भारत तुर्कस्तानला सर्वतोपरी मदत करत आहे. मग ती एनडीआरएफ टीम असो वा वैद्यकीय मदत. शुक्रवारी संयुक्त राष्ट्राने मानवतावादी संकटावर मात करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सच्या मदतीचे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे भूकंपानंतर अनेक दिवस ढिगाऱ्याखाली दबलेल्या मुलांनाही जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वात लहान 2 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. तुर्कीच्या हाताय प्रांतात एक नवजात अर्भक त्याच्या घराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. हे मूल फक्त 2 महिन्यांचे आहे (2-Month-Old Baby was Found Alive). जो जवळपास 128 तास घराच्या ढिगाऱ्याखाली दबला होता आणि आता तो सुरक्षित आणि जिवंत सापडला आहे.
तुर्की हे खरे तर चार टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनवर वसलेला देश आहे. कोणत्याही प्लेट्समध्ये भुंकप झाल्यास संपुर्ण तुर्की त्याचा धोका असतो. जाणून घ्या तुर्कीतल्या भूकंपांची नेमकी कारणं बहुतेक तुर्की ॲनाटोलियन प्लेटवर वसलेला देश आहे. ॲनाटोलियन म्हणजे आशिया मायनर. या प्लेटच्या पूर्वेस पूर्व ॲनाटोलियन फॉल्ट आहे. डाव्या बाजूला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आहे. जो अरेबियन प्लेटशी जोडतो. दक्षिण आणि नैऋत्येस आफ्रिकन प्लेट आहे. तर, उत्तरेकडे युरेशियन प्लेट आहे, जी उत्तर ॲनाटोलियन फॉल्ट झोनशी जोडलेली आहे.