इकडे आड तिकडे विहीर! नेपाळ आर्थिक संकटात असतानाच भूकंपाचे सौम्य झटके (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काठमांडू: सध्या नेपाळमध्ये राजकीय गोंधळ सुरु आहे. याचदरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी (08 मार्च) नेपाळच्या दोन भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. नेपाळ राष्ट्रीय भूकंप केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी काठमांडूपासून 30 किमी अंतरावरील बांगलुंग जिल्ह्यात 4.1 तीव्रतेच्या भूकंपाचा झटका जाणवला. या भूकंपाचे केंद्र खुखानी शहरात होते.
दोन वेळा नेपाळची जमीन हादरली
बांगलुंगपासून 40 किमी अंतरावर असलेल्या म्याग्दी जिल्ह्यात पहाटे 3:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूंकपाची तीव्रता 4 रिश्टर स्केलवर होती. या भूकंपाचे क्रेंद्रबिंदू म्याग्दी जिल्ह्यातील मुरी भागात होते. अशी माहिती भूकंप देखरेख केंद्राने दिली. हा झटका 4 रिश्टर स्केलचा असल्याने सौम्य धक्का जाणवला. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
याआधीही भूकंप
यापूर्वीही 28 फेब्रुवारी रोजी नेपाळमध्ये 6.1 तीव्रतेच्या धक्क्याने नेपाळची जमीन हादरली होती. हा भूकंप इतका जोरदार होता की, यामुळे लोकांच्या घराचे पंखे, खिडक्या आणि दरवाजेही हादरले होते. राष्ट्रीय भूकंप केंद्र आणि संशोधन केंद्राने याची पुष्टी केली होती. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र काठमांडूपासून 65 किमी अंतरावर पूर्वेला होते.
भूकंप का आणि कसे होतात?
भूकंप वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी पृथ्वीची रचना समजून घेणे महत्त्वाचे आहे. पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. याखाली द्रवरूप लावाचे थर असतात, ज्यावर या प्लेट्स तरंगत असतात.
भूकंप घडण्याची प्रक्रिया
नेपाळमध्येच सारखे भूकंप का?
आयआयटी कानपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि भूविज्ञान अभियांत्रिकीतील तज्ज्ञ प्रा. जावेद एन मलिक यांच्या मते, 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 ते 8.1 तीव्रतेचे भूकंपही झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळ होता. हिमालय पर्वतरांगातील अस्थिर टेक्टोनिक प्लेट्समुळे भूकंपाचे धक्के जाणवत राहतील.