कॅनडात भीषण विमान अपघात, दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिक ठार! दोघंही मुंबईचे रहिवासी

हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान आहे. डाउनटाउन चिलीवॅकमधील मोटेलच्या मागे झाडे आणि झुडपांमध्ये विमान कोसळले. या घटनेत भारतीय नागरिकांव्यतिरिक्त आणखी एका पायलटचाही मृत्यू झाला आहे.

    कॅनडातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया राज्यात शनिवारी विमानाचा भीषण अपघात (Canada Plane Crash) झाला. या घटनेत दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. हे लहान आकाराचे विमान वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. उड्डाणाच्या वेळी विमान झाडावर आदळले. अभय गद्रू आणि यश विजय रामुगडे अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. दोघेही मुंबईचे रहिवासी होते.

    विमान अपघातात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. पायलट अभय गद्रू आणि यश विजय रामुगडे हे मुंबईचे रहिवासी होते. कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या अपघातात एकूण तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

    ज्या विमानाला अपघात झाला ते पाईपर पीए-34 सेनेका होते. हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान आहे. डाउनटाउन चिलीवॅकमधील मोटेलच्या मागे झाडे आणि झुडपांमध्ये विमान कोसळले. या घटनेत भारतीय नागरिकांव्यतिरिक्त आणखी एका पायलटचाही मृत्यू झाला आहे.

    कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी या घटनेवर नियंत्रण मिळवल्याचे निवेदन जारी केले आहे. इतर कोणीही जखमी किंवा धोका असल्याची नोंद नाही. घटनास्थळी पाच रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक पाठवण्यात आले. दोन एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर मार्गावर होती, परंतु त्या भागात पोहोचण्याआधीच ते मागे वळवण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली.