(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काबूल: युद्ध एक अशी गोष्टी आहे, ज्यामुळे केवळ विनाश आणि दु:ख निर्माण होते. मानवी जीवन, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि समाजरचना उद्ध्वस्त होते. निर्दोष लोकांचा बळी जातो, तर पुढच्या पिढ्यांवरही याचे परिणाम होतात. युद्ध हा प्रश्न सुटण्याचा मार्ग नाही, तर तो अधिक समस्या निर्माण करतो. शांतता आणि संवाद हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे. तरीही अनेक देश सध्या युद्ध लढत आहेत. यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.
अफगाणिस्ताणमधील ब्रिटीश सैनिकांवर आरोप
अफगाणिस्ताणमध्ये तैनात असलेल्या ब्रिटीशच्या सैनिकांनी 2010 ते 2013 दरम्यान अनेक नागरिकांना ठार मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सैनिकांनी न्यायालयीन प्रक्रियेविना अनेकांना मारले आहे. फक्त हत्या करण्याचाच नाही तर आपले गुन्हे लपवण्याचा देखील आरोप सैनिकांवर आहे. या संदर्भात बुधवारी (8 जानेवारी 2025) एका तपशीलवार अहवालात या काळातील युद्ध अपराधांचा कच्चा चिठ्ठा उघड करण्यात आला आहे.
युद्ध अपराधांची चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, युनायटेड किंगडमच्या संरक्षण मंत्रालयाने 2022 मद्ये या घटनेची चौकशी सुरु केली होती. या चौकशीदरम्यान, ब्रिटीश सैनिकांच्या विशेष तुकडीने अफगाण नागरिकांवर केलेल्या अत्याचारांची आणि हत्यांची सविस्तर माहिती समोर आली आहे. चौकशीच्या अहवालानुसार, ब्रिटिश विशेष वायु सेवेच्या (SAS) सैनिकांनी ‘गोल्डन पास’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अधिकाराचा गैरवापर केला असून या अंतर्गत सैनिकांना लोकांना ठार मारण्याची मोकळीक मिळाली होती, यातून ते कोणत्याही प्रकारच्या कारवाईतून वाचू शकतात असे म्हटले जात आहे.
सात सैनिकांची गुप्त गवाही
चौकशीदरम्यान ब्रिटिशच्या विशेष तुकडीच्या सात सैनिकांनी आपली साक्ष दिली, मात्र सुरक्षा कारणास्तव त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. या गवाहीत उघड झाले की, अनेक पीडित 16 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सैनिकांनी निहत्थ्या आणि निरपराध अफगाण नागरिकांची हत्या केल्याचे म्हटले आहे. गवाही देणाऱ्या एका सैनिकाने खुलासा केला आहे की, क्रूर कार्य लपवण्यासाठी विविध उपाय करण्यात आले. अनेक प्रकरणांमध्ये सैनिकांनी बंदी बनवलेल्या व्यक्तींपासून कोणताही धोका नसतानाही त्यांना ठार मारले.
युद्ध अपराधांविरोधातील न्यायाची लढाई
ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाने या गंभीर घटनांची चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, या घटनांनी ब्रिटिशांच्या नैतिकतेवर आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या काळ्या कृत्यांमुळे अफगाण नागरिकांवरील ब्रिटिश सैन्याच्या वागणुकीची भीषणता उघड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध अपराधांविरोधात न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज तज्ञांनी अधोरेखित केली आहे.