रशिया युक्रेन तणाव शिगेला! कीववर मॉस्कोचा बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा ; ४ ठार अन्... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War : मॉस्को/कीव : रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War)आता तीव्र होत चालले आहे. रशिया सतत युक्रेनवर हल्ले करत आहे. यामुळे युक्रेनला गंभीर नुकसान सहन करावे लागत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला केला आहे.
शुक्रवारी(२४ ऑक्टोबर) रात्री युक्रेनची राजधानी कीववर हल्ला केला आहे. या हल्ल्यात उर्जा सुविधा आणि रेल्वे व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच हल्ल्यात ४ नागरिक ठार झाले असल्याचे आणि डझनभर जखमी असल्याचे वृत्त समोर आले आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियाच्या या हल्ल्याला युद्ध गुन्हा म्हटले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तक्षेपाची विनंती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रशियाने कीववर हल्ला सुरु केला होता. त्यांनी कीवच्या बाहेरील वीज प्रकल्प आणि रेल्वे जंक्शनला लक्ष्य केले. रशियाने युक्रेनवर ५०० किलोमीटरपर्यंत ७०० किलोग्रॅम स्फोटके वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. कीवचे महापैर विटाली क्लिट्स्को यांनी ची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितेल की, रशियाच्या हल्ल्यामुळे कीवच्या ४०% उर्जा यंत्रणेचे नुकसान झाले आहे. हजारो घरांमध्ये वीज खंडित झाली आहे. रुग्णालये जनरेटवर आहेत. तसेच रेल्वे व्यवस्थेलाही गंभीर नुकसान झाले आहे.
Last night, Russia attacked Ukraine again—this time with dozens of attack drones and nine ballistic missiles. There was a missile strike on Kyiv. Sadly, there are killed people. My condolences to their families and loved ones. Dozens of people were injured. And almost every… pic.twitter.com/y3s2vyGR5R — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) October 25, 2025
रशियाच्या या विनाशकारी हल्ल्यामुळे युक्रेनला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे युक्रेनच्या रेल्वेच्या पुरवठा व नागरी प्रवसावार मोठा परिणाम झाला आहेे. यामध्ये रेल्वे ट्रॅकचे काम करणाऱ्या तरुणांचा मृत्यू झाल आहे. तसेच एका ६५ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. पण वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात अडचणी येत आहेत.
झेलेन्स्कींचा संताप
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत हा हल्ला आमच्या नागरिकांना मारण्यासाठी केला जात आहे, आम्ही हारणार नाही, प्रतिकार करत राहू असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी नाटो देशांना शस्त्र पुरवठ्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान रशियाने या हल्ल्याची जबाबदारी स्वाकरली असून त्यांनी म्हटले आहे की, हा हल्ला युक्रेनने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर आहे. सध्या या धगधगत्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे युद्ध थांबवण्यासाठी देखील प्रयत्व सुरु आहेत.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. रशियाने युक्रेनवर कुठे हल्ला केला?
रशियाने युक्रेनच्या राजधानी कीववर बॅलेस्टिक मिलाइल्सचा मारा केला आहे.
प्रश्न २. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या किती नागरिकांचा मृत्यू झाला ?
रशियाच्या कीववरील नुकत्याच झालेल्या हल्ल्यात ४ युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर डझनभर जखमी झाले आहेत.






