भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर..., ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी
वॉशिंग्टन: सध्या अमेरिका आणि कॅनडात टॅरिफवरुन मोठा संघर्ष सुरु आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला वाईट देश म्हणून संबोधले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या उत्पादनांवर 25 टक्के कर लादल्यानंतर व्यापर युद्ध सुरु झाले. नंतर कॅनडानेही प्रत्युत्तरदाखल अमेरिकवर समान कर लादण्याची घोषणा केली.
सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर मोठे खळबळजनक विधान केले आहे. मंगळवारी (18 मार्च) एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी, “कॅनडा हा जगातील सर्वात वाईट देशांपैकी एक आङे आणि त्यांचा सामाना करणे खूप कठीण आहे” असे म्हटले.
जस्टिन ट्रुडोंवर साधला निशाणा
या मुलाखतीदरम्यान त्यांनी जस्टिनी ट्रुडोंवरही तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कॅनडा हा जगातील सर्वात वाईट देशांपैकी आहे, त्यांच्याशी व्यवहार करणे खूप कठीण आहे, मात्र ट्रुडो चांगले होते. मी त्यांना गव्हर्नर ट्रुडो म्हणायचो, त्यांचे लोक खूप वाईट होते आणि खोटे बोलणारे होते.”
.@POTUS: “One of the nastiest countries to deal with is Canada. Now, this was Trudeau — good old Justin. I call him ‘Governor Trudeau.’ His people were nasty and they weren’t telling the truth.” pic.twitter.com/Sf7cyaVfSU
— Rapid Response 47 (@RapidResponse47) March 19, 2025
ट्रम्प यांनी कॅनडाला अध्यक्ष बनण्यापूर्वीचे केले होते लक्ष्य
खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मात्र त्यांनी शपथ घेण्यापूर्वीच कॅनडावर निशाणा साधला होता. ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचा 51 वा भाग बनण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कॅनडा सरकराने ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला होता. कॅनडाचे लोकांनी त्यांना त्यांचे सार्वभौमत्त आणि स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे असे म्हटले होते.
कॅनडाचे नवे पंतप्रधानांची अमेरिकबाबत भूमिका
सध्या मार्क कार्नी यांच्या कॅनडाचे 24 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. कॅनडाचे नवनियुक्त पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पदभार स्वीकारताच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी कॅनडावर लादलेल्या धोरणांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, “अमेरिका कधीही कॅनडाचा ताबा घेऊ शकत नाही,” असे ठामपणे सांगितले.
अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपावर कडक शब्दांत उत्तर
मार्क कार्नी यांनी स्पष्ट केले की, “शेजारी देश आमच्या संसाधनांचा गैरवापर करू इच्छित आहे. त्यांना आपले पाणी, जमीन आणि संपूर्ण देश गिळंकृत करायचा आहे, पण कॅनडा कधीही गुडघे टेकणार नाही.” त्यांनी नाव न घेता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका स्वतःच्या संस्कृतीचा नाश करत आहे. “कॅनडा विविधतेचा आदर करणारा देश आहे, आणि कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग होणार नाही,” असे त्यांनी ठणकावले.